शरद पवारांनी महाराष्ट्राचा दौरा केला की ते सत्तेत येतात – सुप्रिया सुळे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शरद पवारांनी महाराष्ट्राचा दौरा केला की ते सत्तेत येतात – सुप्रिया सुळे

इंदापूर, (प्रबोधन न्यूज) - इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळेंनी शरद पवारांबाबत केलेलं विधान चर्चेत आलं आहे. “शरद पवारांनी महाराष्ट्राचा दौरा केला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

शरद पवारांच्या सोलापूर दौऱ्याचाही सुप्रिया सुळेंनी यावेळी उल्लेख केला. “महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. इतके लोक पक्ष सोडून जात होते की काही हिशोबच नव्हता. त्यानंतर दोन्ही खिशात काही नाही असं होतं. पण शरद पवार सोलापूरला गेल्यानंतर जी कुस्ती सुरु झाली, ती निकालाच्या दिवशीच संपली”, असं विधान सुप्रिया सुळेंनी इंदापुरात बोलताना केलं.

''निवडणुकीमध्ये पडझड होत असते हे आमच्यापेक्षा कुणीही जास्त जवळून पाहिलेला नाही, कारण शरद पवार यांचे राजकारण व समाजकारण जर पाहिले तर 55 वर्षाच्या काळात जेवढे चढ आहेत तेवढेच उतार आहेत. 55 वर्षात 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्षे विरोधात गेली आहेत. मी त्यांना नेहमीच सांगते, महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलेच पण विरोधात असताना महाराष्ट्राने तुम्हाला सर्वात जास्त प्रेम दिल आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. विरोधात असताना ते दौऱ्यावर निघतात पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही, काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात'' असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळेंच्या या विधानावर बावनकुळेंनी पलटवार केला आहे. “तो काळ गेला आहे. शरद पवारांचं नाव आणि काम वापरून तुम्ही किती दिवस मोठे व्हाल? स्वत:चं कर्तृत्वही दाखवावं लागेल. शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यात काम केलं आहे. पण त्यांच्या कामावर दुसरे तरून जातील असा काळ आता गेला आहे. जो पदावर आहे, तो किती काम करतो हे पाहिलं जातं. आता जनता तर बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा विचाराची आहे”, असं बावनकुळे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “मी बारामतीत जेव्हा गेलो, तेव्हा एवढंच म्हटलं की जर घड्याळ बंद पाडायचं असेल, तर बारामतीतून पाडा. कार्यकर्त्यांना मी आवाहन केलं. त्यानंतर सुप्रिया सुळेंना आता रोज २५ गावं फिरावी लागत आहेत. बारामती या एकाच मतदारसंघात सरकार पोहोचलं आहे. बाकी पाचही विधानसभेत कोरी पाटी आहे. त्यामुळे तिथे प्रचंड नाराजी आहे. मला विश्वास आहे की ४५ हून अधिक लोकसभा आम्ही जिंकणार आहोत. त्यात बारामती क्रमांक एकवर असेल. तिथे कोणताही स्टार उमेदवार देण्याची गरज नाही. तिथे साधा उमेदवारही जिंकेल”, असा खोचक टोला बावनकुळेंनी बोलताना लगावला.