राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता 1 नोव्हेंबरला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता 1 नोव्हेंबरला

नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) – शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकेसह एकूण चार याचिकांवरील सुनावणी आता दिवाळी नंतर म्हणजे 1 नोव्हेंबरला होणार आहे. धनुष्यबाण पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यानंतर आमदारांची अपात्रता, राज्यपालांचा निर्णय या याचिकांवर आता १ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षावरील सुनावनीला न्यायालयात तारीख पे तारीख सुरुच आहे.

यापूर्वी झालेल्या सुनावणीत कोणत्याही बाजूच्या आमदारांना अपात्र ठरवू नका, जैसे थे परिस्थिती ठेवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. तर, खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा निर्णय कोर्टाने निवडणुक आयोगावर सोपवला आहे. 1 नोव्हेंबरला आमदार अपात्र ते सह इतर मुद्द्यांवर सुनावणी होणार आहे. सुनावणीवर शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य ठरणार आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या लढाईकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

या चार याचिकांवर होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी

1) एकून 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान

2) राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशांना आव्हान

3) शिंदे गटाच्या प्रतोदाला शिवसेनेचा प्रतोद म्हणून मान्यता देण्यास आक्षेप

4) एकनाथ शिंदे यांचा शपथविधीला आणि विशेष अधिवेशनाला आक्षेप

यापूर्वी झालेल्या सुनावणीत कोणत्याही बाजूच्या आमदारांना अपात्र ठरवू नका, जैसे थे परिस्थिती ठेवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. तर, खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा निर्णय कोर्टाने निवडणुक आयोगावर सोपवला आहे.

1 नोव्हेंबरला आमदार अपात्र ते सह इतर मुद्द्यांवर सुनावणी होणार आहे. सुनावणीवर शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य ठरणार आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या लढाईकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.