इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात अजूनही इंधन महागच
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - शिंदे सरकारने गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत इंधन स्वस्त करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पेट्रोलवरील प्रतिलिटर ५, तर डिझेलवरील प्रतिलिटर ३ रुपये व्हॅट कमी करण्यात आला आहे. मात्र भाव कमी केल्यानंतरही भाजपशासित गुजरातपेक्षा १० रुपये व कर्नाटकपेक्षा ५ रुपये दर राज्यात अधिक असतील हे स्पष्ट झाले आहे. मविआच्या काळात भाजपने व्हॅट ५० टक्के कमी करावा अशी सूचना केली होती. दर कमी करण्याची स्वतःवर वेळ आल्यावर मात्र स्वतःच्याच मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
पेट्रोलवर ३२.५५ पैसे प्रतिलिटर व्हॅट होता. ५ रुपयांनी कपात केली म्हणजे ही कपात १५ टक्के आहे. डिझेलवर २२.३७ पैसे प्रतिलिटर व्हॅट होता, त्यात ३ रु. कपात केली म्हणजे कपात केवळ १३ % आहे.
दरम्यान, भाजपने फक्त सत्तेत येण्यासाठी महागाईला विरोध केला असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात आला आहे. यावेळी पक्षाचे सीताराम ठोंबरे म्हणाले की, सत्तेत येण्यापूर्वी भाजप नेत्यांनी महागाई विरोधात आंदोलन करीत मत मागितली. त्यापूर्वी नागरिकांना ४०० रुपये घरगुती सिलिंडर मिळत होते, तसेच त्यावर अनुदान मिळत होते. मात्र, भाजप सत्तेत आल्यानंतर अनुदान बंद करून एक मोठा धक्का सरकारने दिला. यानंतर आठ वर्षात वारंवार गॅस दरवाढ करताना ३ दिवसांपूर्वी ५० रुपये दरवाढ करून १०५३ रक्कम आता मोजावी लागत आहे. त्याचबरोबर २० रुपये घरपोच सेवा देण्यासाठी द्यावे लागतात, असे मिळून ते सिलिंडर १०७३ रुपयांना मिळते.
डिझेल व पेट्रोलच्या किमती वाढवणे किंवा कमी करणे यावर सरकारचा कंट्रोल नाही, असे सरकार सांगत असले तरी निवडणुकांच्या काळात कोणतीही वाढ होऊ दिली नाही. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढ करून व दाखविण्यासाठी अल्पशी रक्कम कमी करून जनतेची दिशाभूल करत आहेत. सीएनजी व पीएनजी हे सुरवातीला स्वस्त मिळत असल्याने नागरिकांनी सीएनजी व पीएनजी वाहने खरेदी केली किंवा असलेली वाहने सीएनजी व पीएनजीवर करण्यात आली. मात्र, सीएनजी व पीएनजी वाढ ही आज डिझेल व पेट्रोल बरोबर होताना दिसत आहे. तरी केंद्र सरकारने दरवाढ त्वरित रद्द करून सामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.