उद्धव ठाकरेंचा एवढा पुळका असेल तर मातोश्रीवर जाऊन भांडी घासा' – निलेश राणे (video)

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

उद्धव ठाकरेंचा एवढा पुळका असेल तर मातोश्रीवर जाऊन भांडी घासा' – निलेश राणे (video)

मुंबई, (प्रबोधन न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिंदे-भाजप सरकार सहा महिन्यांवर टिकणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कामाला लागावे असे आवाहन केले आहे. त्याची प्रचिती हळूहळू यायला लागली आहे. या अगोदर भाजपचे किरीट सोमय्या यांनी शिवसेना प्रमुख उद्धवराव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे शिंदे गटात तीव्र नाराजी पसरली होती. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे दोन्ही चिरंजीव यांचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यात तीव्र बेबनाव होताना पाहायला मिळत आहे. निलेश राणे यांनी खालच्या स्तरावर जाऊन केसरकर यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांचा एवढा पुळका असेल तर मातोश्रीवर जाऊन भांडी घासा अशी टीका ट्विटद्वारे  केली आहे.

काल निलेश राणेंनी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये ते म्हणाले होते की दीपक केसरकर तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते आहात आमचे नाही. युती टिकवण्याची जबाबदारी जितकी आमची आहे तितकीच तुमची आहे. तुम्हाला इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका. राणेंच्या दोन्ही मुलांनी मतदार संघात तुमची काय अवस्था केली आहे हे विसरु नका. तुम्हाला दुसरं राजकीय जिवदान मिळाले आहे असेही निलेश राणे म्हणाले.

दरम्यान याअगोदर ही किरीट सोमय्यांना उद्धव ठाकरेंवरती टीका करु नका असे सांगण्यात आले आहे. किरीट सोमय्या हे पत्रकार परिषद घेवून ठाकरे कुटुबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. त्यावर दीपक केसरकर यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगून उद्धव ठाकरेंवरती टीका करु नका अशी समज किरीट सोमय्यांना द्या अशी विनंती केली होती. त्यानंतर किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली नाही.

बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनीही किरीट सोमय्यांवरती टीका केली होती. उद्धव ठाकरेंवरती बोलणे थांबवा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, आम्हाला सत्तेची पर्वा नाही सत्तेला लाथ मारुन बाहेर पडू अशी ताकिद गायकवाडांनी सोमय्यांना दिली होती. आता यानंतर निलेश राणे आणि दीपक केसरकर वाद शिगेला पोहोचला आहे. आता हा वाद कुठपर्यंत जातो हे पाहावं लागणार आहे.

https://twitter.com/i/status/1547196032974352385