अजितदादांचा 'मास्टरस्ट्रोक', मंत्रालयात आता शिंदे आणि फडणवीस झाले शेजारी!
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई , (प्रबोधन न्यूज ) - राष्ट्रवादीमध्ये बंड करून अजितदादा सरकारमध्ये सामील झाले आहे. मागील 5 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयातील मुख्य इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर त्यांचं शासकीय कार्यालय दिले आहे. सामान्य प्रशासन विभागाने याविषयी शासन निर्णय काढून जाहीर केलेला आहे.
अजित पवार यांनी मागील रविवारी 2 जुलै रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांना नेमकं मंत्रालय कार्यालय कुठे दिला जाईल यावरून राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा रंगली होती. आतापर्यंतच्या इतिहासात सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची कार्यालय होती. अर्थात उपमुख्यमंत्री आतापर्यंत एकच होते पण पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री झाल्याने नवीन झालेल्या उपमुख्यमंत्र्यांना कार्यालय कुठे दिला जाईल यावरून मंत्रालयामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये चर्चा रंगू लागली होती. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगदी बाजूचे कार्यालय जे आहे ते देण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांचे कार्यालय त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी यांचे कार्यालय हे सहाव्या मजल्यावर ती होते या दोघांचेही कार्यालय रिकामे करून अजित पवारांकरता उपमुख्यमंत्री कार्यालय हे तयार करण्यात आले आहे. या कार्यालयाचे सध्या कामकाज सुरू असून हे कार्यालय पूर्णता तयार झाल्यानंतर अजित पवारांना देखील या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली जाईल.