सिद्धेश्वर इंग्लिश मिडीयम हायस्कूलला झिरो वेस्ट पुरस्कार जाहीर
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी-चिंचवड, दि. ६ एप्रिल - राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राबविलेल्या ‘संकल्प स्वच्छतेचा, सुंदर भोसरीचा' या उपक्रमांतर्गत सिद्धेश्वर इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये शून्य कचरा मोहीम राबविण्यात आली. ओला कचरा शाळेतच जिरविला जातो. सुका कचराही महापालिकेकडे दिला जात नाही. त्यामुळे झिरो वेस्ट निर्माण करणारे भोसरीतील सिद्धेश्वर हायस्कूल हे महाराष्ट्रातील पहिले खासगी हायस्कूल ठरले आहे.
वैशाली अजित गव्हाणे आणि आसरा फाउंडेशनच्या अर्चना मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरीतील सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये झिरो वेस्ट ही संकल्पना राबविण्यात आली. या शून्य कचरा प्रकल्पाचे मंगळवारी आयुक्त राजेश पाटील यांच्यासमोर सादरीकरण केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, प्राचार्या सुलक्षणा मुटकुले, सविता सस्ते आदी यावेळी उपस्थित होते.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, “शहर अतिशय वेगाने वाढत आहे. प्रचंड नागरीकरण होत आहे. शहर वाढत असताना पर्यावरणाचा समतोल राखला नाही. तर, त्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. भविष्यातील पिढ्याची मोठी हानी होईल अशी परिस्थिती
आहे. मोशी कचरा डेपोत कचऱ्याचे पर्वत आहेत. पुढील 50 वर्षात असे किती पर्वत बघायला मिळतील. त्यासाठी कचऱ्याचे व्यवस्थापन आपण स्वतःपासून केले नाही तर, भविष्यात जीवन जगण्याची पातळी खालावणार आहे. रोगराई वाढेल. निसर्ग, पर्यावरणात अनिश्चितता वाढली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर शहर करायचे आहे. त्यासाठी लोकांचाही प्रतिसाद मिळत असून प्रत्येक प्रभागात 90 टक्के कचऱ्याचे विलगीकरण होत आहे".
शून्य कचरा संकल्पना सर्वांना कळली आहे. स्वच्छतेची चळवळ सर्व शाळांमध्ये सुरू व्हावी. चळवळ सुरू झाल्यास नक्कीच आपले शहर स्वच्छ होईल. शहरातून इ प्रभाग सर्वात स्वच्छ, कचरा कुंडी मुक्त आहे. ओला, सुका, कचऱ्याचे 90 टक्के वर्गीकरण होते. शाळेतूनच शून्य कचयाचे संस्कार दिले जात आहेत, याचा अभिमान आहे.शाळा शून्य कचरा निर्माण करणारी झालेली आहे. शाळेला मालमत्ता कराच्या स्वछता करात ५० टक्के सवलत दिली जाईल. शून्य कचरा उपक्रम राबविणान्या शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. शहरातील शाळांना शून्य कचरा उपक्रम पाहण्यासाठी या शाळेला भेट देण्यास सांगितले जाईल, असेही आयुक्त पाटील म्हणाले.