आईच्या डोळ्यादेखत खेळणाऱ्या मुलाचा डोक्यात बफिंग मशिन पडून मृत्यू (व्हिडिओ)
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी (प्रबोधन न्यूज) - काल पिंपरी चिंचवड मध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, आईच्या डोळ्यांदेखत तिच्या 6 वर्षीय पोटच्या गोळ्याचा करूण अंत झाला आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पिंपळेगुरव येथील नीता फॅब्रिकेशन या दुकानात काल ही धक्कादायक घटना घडली.
पिंपरी चिंचवड येथे राहणारा चिमुकला युवान दौंडकर (वय 6 वर्ष) याचा मृत्यू झाला आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नीता फॅब्रिकेशनचे गाडी वॉशिंग सेंटर आहे. येथे पिंपळे सौदागर येथे राहणारे युवान आणि त्याची आई आपली दुचाकी सर्व्हिससाठी गेले होते. गाडी सर्व्हिसिंगचे काम सुरु असताना युवान बाजूला खेळत होता. सोबत आई बसली होती.
सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये एकूण चार लोक दिसून आलेत. दोघे जण फॅब्रिकेशनचं काम करताना दिसत आहेत. तर आई एका बाकावर बसली आहे. तर मुलगाही तिच्यासोबत आहे. मुलगा खाली बाकड्याशेजारी उभा आहे. आई आणि मुलगा यांचा एकमेकांशी संवाद सुरु आहेत. यात एका क्षणी मुलगा शेजारी असलेल्या एका मशिनसोबत खेळायला जातो. ते मशिन तो हाताने हलवत होता, पण इतक्यात होत्याचं नव्हतं झालं.
मशिन सोबत खेळण्याच्या प्रयत्नात असतानाच ही वजनदार लोखंडी मशिन या मुलाच्या थेट डोक्यावरच उलटते. त्यात या मुलाच्या डोक्याला गंभीर इजा होते. लोखंडी मशिन अंगावर पडल्यानं या सहा वर्षांच्या चिमुरड्याला इतका जबर मार बसतो, की त्यातच त्याचा मृत्यू होतो. अवघ्या काही क्षणांत मुलाच्या जाण्याने या मुलाच्या आईलाही जबर धक्का बसलाय. निष्काळजीपणा केल्याप्रकरणी दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी सांगितले आहे.