आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा मनपा भवनाला टाळे ठोकू : डॉ. कैलास कदम
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मागील दोन वर्षापासून दिवसाआड, कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात अद्यापही आवश्यक तेवढा पाणी साठा शिल्लक आहे. याविषयी शहर काँग्रेसच्या वतीने अनेक वेळा मोर्चे, आंदोलन करण्यात आले आहे. पुढील आठ दिवसात संपूर्ण शहरातील विशेषता प्राधिकरणातील सर्व पेठांमधील पाणीपुरवठा, पूर्ण दाबाने, पूर्ण वेळ झाला नाही तर शहर काँग्रेसचे कार्यकर्ते मनपा भवनाला टाळे ठोकून घेराव घालतील तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनाच्या बाहेर जाऊ देणार नाहीत असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिला आहे.
सोमवारी (दि.२७ जून २०२२) डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना निवेदन दिले या निवेदनात पुढे म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेसने याविषयी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनासमोर उपोषण केले होते, यावेळी मंत्री सुनील केदार आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी उपोषण स्थळी भेट दिली होती. त्यावेळी आयुक्त तसेच पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. यानंतर झालेल्या बैठकीत उपोषणकर्त्या महिला प्रतिनिधींना लेखी आश्वासन दिले होते.
यानंतर ही शहरातील पाणीपुरवठा मध्ये एकही टक्का सुधारणा झालेली नाही. उलट प्राधिकरणातील सर्व पेठांमध्ये मागील आठ दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. काही पेठांमध्ये तर चार दिवसापासून पाणी देण्यात आले नाही. अनेक सोसायट्यांमध्ये खाजगी टँकरने पाणी घेतले जात आहे. याबाबत सत्य परिस्थिती काय आहे हे प्रशासन तुमच्यासमोर मांडत नाही. पाणी पुरवठयाबाबत शहरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. याबाबतीत नागरिकांचा रोष वाढत आहे. याचा कधीही उद्रेक होऊ शकतो याविषयी आपण निव्वळ वेळ काढूपणाची भूमिका घेऊ नये. तर भामा आसखेड तसेच आंद्रा धरणातून पाणीपुरवठा करणा-या विषयाच्या प्रकल्पाची सद्य आणि सत्य परिस्थिती काय आहे. याचा प्रत्यक्ष जागेवर जाऊन आढावा घ्यावा आणि यावेळी शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाला बरोबर घ्यावे. उपोषण, आंदोलन, हंडामोर्चा, निषेध पत्रके काढूनही ढिम्म आणि सुस्त झालेल्या प्रशासनाला काही फरक पडत नाही असे आमच्या निदर्शनास आले आहे.
पुढील आठ दिवसात संपूर्ण शहरातील विशेषता प्राधिकरणातील सर्व पेठांमधील पाणीपुरवठा, पूर्ण दाबाने, पूर्ण वेळ झाला नाही तर शहर काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनाच्या बाहेर जाऊ देणार नाहीत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनास काँग्रेसच्यावतीने टाळे ठोकून पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत “ठिय्या आंदोलन” करू, यानंतर उद्भभवणार्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असेल असेही पत्रात नमूद केले आहे.
यावेळी महिला काँग्रेसचे शहराध्यक्ष सायली नढे, माजी महापौर कवीचंद भाट, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी उमेश खंदारे, आयुब कुरेशी, डॉ. मनीषा गरुड, किरण नढे, ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते.