प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 'स्वच्छता हीच सेवा' या मोहिमेची पथनाट्याद्वारे जनजागृती
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
- कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने 'स्वच्छता पथनाट्य जनजागृती अभियान' या मोहिमेचे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा यांनी उद्घाटन केले. तसेच 'स्वच्छता हीच सेवा' या राष्ट्रीय अभियानांतर्गत संपूर्ण शहरात राबविण्यात आलेल्या 'एक तास स्वच्छतेसाठी' या स्वच्छताविषयक मोहिमेची सुरुवात केली.
सर्वप्रथम प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थी लीना चोपडे व अमिता विश्वकर्मा यांनी वाचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विभाग प्रमुख डॉ. सुवर्णा गायकवाड होत्या. प्रस्तावना व सूत्रसंचालन डॉ. गीता कांबळे, प्रा. अस्मिता यादव यांनी केले. बीएडच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण व स्वच्छतावर आधारित पथनाट्य सादर केले. आभार प्राजक्ता कोरडे यांनी मानले. .
कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. या मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेतील, एमबीए, एमसीए, कला, वाणिज्य, विज्ञान व शालेय अशा ४२९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, डॉ. पौर्णिमा कदम, सविता ट्रॅव्हीस, उपप्राचार्य डॉ. वनिता कुऱ्हाडे, एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे संचालक डॉ. सचिन बोरगावे यांचे मार्गदर्शन व प्रा. निजी साजन यांच्या संयोजनाखाली चिंचवड रेल्वे स्थानक परिसर, रेल्वे आरक्षण केंद्र, रेल्वे फलाट व रेल्वे रुळावरील कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून परिसरात स्वच्छता केली. यावेळी चिंचवड रेल्वे स्थानक प्रमुख प्रशांत लेन्का यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विभागप्रमुख प्रा. गुरुराज डांगरे, प्रा. मनीष पाटणकर यावेळी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 'एक तास स्वच्छता' या अभियान चिंचवडगावात संपन्न झाले. त्याचे संयोजन प्रिया माथूरकर यांनी केले. प्रतिभा कॉलेज ऑफ कॉम्प्युटर स्टडीजच्या प्राचार्य डॉ. क्षितिजा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन क्लब, राष्ट्रीय सेवा योजनेच्या व इतर विद्यार्थ्यांनी काळभोरनगर येथील हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. आश्लेषा देवळे, प्रा. सुकलाल कुंभार, प्रा. प्रीती कोल्हे यांनी केले.
प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या वतीने डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवडगावातील मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रा. अर्चना गांगड आदींनी संयोजन केले.
प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सविता ट्रॅव्हीस यांच्या मार्गदर्शनाखाली मोहननगर, आकुर्डी परिसरात संपन्न झाला. स्वच्छता विषयक संदेश देणारे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी घोषणा देत जनजागृती केली. पथनाट्य गर्दीच्या ठिकाणी केले. शिक्षक अंकित दुबे, वनिता जगताप, प्राजक्ता डिंगणकर यांनी संयोजन केले. इयत्ता सातवी ते इयत्ता बारावीच्या मुलांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहिमेत जमा केलेला कचरा पिशवीत गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.