आदित्य एल-१ मोहिमेच्या गगनभरारीचं पुणे कनेक्शन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर यशस्वी लँडिग केल्यानंतर आता भारताने सूर्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोसने आज आदित्य-एल 1 यशस्वीरित्या लाँच केलं आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही-सी५७ रॉकेटद्वारे आदित्य-एल१ ने सूर्याच्या दिशेने झेप घेतली आहे.
या यशाचे कौतुक करावे तितके कमीच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारताच्या भरारीचे कौतुक केले आहे. तसेच या मिशनमध्ये पुण्यातील 'आयुका' संस्थेचा उपग्रहावरील संशोधन उपकरण निर्मितीत सक्रिय सहभाग अभिमानास्पद असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विषेश उल्लेखामुळे पुण्यातील 'आयुका' हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्यामुळे 'आयुका' संस्था आहे तरी काय? ही संस्था नेमकं काय करते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 'आयुका' ही पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेली एक एक संशोधन संस्था आहे.
आयुकातील शास्त्रज्ञ खगोलशास्त्र, खगोलभौतिकी आणि भौतिकशास्त्रातील क्वांटम गुरुत्व, विश्वनिर्माणशास्त्र, गुरुत्वीय लहरी, ऑप्टिकल आणि रेडिओ खगोलशास्त्र अशा अनेक विभागात संशोधन करतात. १९८८ मध्ये जागतिक दर्जाची ख्याती असणारे खगोलशास्त्रज्ञ 'जयंत नारळीकर' यांनी अजित केंभावी व नरेश दधीच यांच्यासोबत आयुकाची स्थापना केली होती.
सर्वसाधारणपणे खगोलशास्त्रज्ञांच्या गरजा भागावण्याशिवाय ही वेधशाळा काही वेळ प्रशिक्षणासाठी आणि भारतीय विद्यापीठांमधून येणाऱ्या निरीक्षण प्रस्तावांसाठी राखून ठेवते. वेगवेगळ्या अवकाश मोहिमेत आयुकाचा मोठा सहभाग आहे. भारताच्या पहिल्या बहुतरंगलांबी विद्युतचुंबकीय लहरी टिपणाऱ्या ऍस्ट्रोसॅट या उपग्रहाने ९.३ प्रकाशवर्ष दूर असलेली दीर्घिका टिपली होती. यामध्येही आयुकाचा मोठा हातभार होता.