अग्निपथ विरोधाचे लोण आता महाराष्ट्रातही पसरले
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, (प्रबोधन न्यूज) – गेले चार दिवस देशातील १७ राज्यांत अग्निपथविरोधात युवकांचा प्रचंड आक्रोश पाहायला मिळत आहे. या आंदोलनात अब्जावधी मालमत्तेची हानी झाली आहे. रेल्वे गाड्या, बसेस जाळण्यात आल्या. दगडफेक करण्यात आली. केल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले असून आंदोलन करत आहेत. परंतु महाराष्ट्र मात्र शांत होता. कोठेही या आंदोलनाचा मागमूसही नव्हता. पण आता अचानक महाराष्ट्रानेही या आंदोलनात उडी घेतल्याचे दिसत आहे.
वाशिममध्ये आयोजित मोर्चावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलक तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक तरुण जखमी झाले आहेत. लष्करात भरती होऊ इच्छिणारे तरुण या योजने विरोधात संताप व्यक्त करत आहेत. वाशिममध्येही या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड व इतर सामाजिक राजकीय संघटनांनी महाअक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
अग्निपथ योजनेला राष्ट्रवादी काँग्रेसने अकोल्यात निषेध नोंदवला आहे. अकोला-जम्मू तावी नांदेड हमसफर एक्स्प्रेसला थांबवून रेल रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने पोलीस विभागात खळबळ उडाली, रेल्वे रोको केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मध्य रेल्वेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवला. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत 8 मिनिटे रेल्वे थांबवली. प्रशासनाच्यावतीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, मात्र अन्य अज्ञात ठिकाणी गाडी थांबवल्यानंतर पोलिसांची पळापळ झाली.
अग्निपथ योजनेविरोधात आंदोलनाचे पडसाद राज्यभर पडताना दिसत आहेत. या योजनेविरोधात देशात अनेक ठिकाणी आंदोलने निदर्शने सुरू आहे. तसेच या योजनेचा निषेध करण्यासाठी आता राष्ट्रवादीदेखील रस्त्यावर उतरली आहे. आज राष्ट्रवादीचे कल्याण-डोंबिवली युवक जिल्हाध्यक्ष राज जोशी यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीत अग्निपथ योजना आणि केंद्र सरकारच्या विरोधात एकत्र येत निदर्शने केली आहेत.
आज ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यकर्त्यांनी पूर्व द्रुतगती महामार्गावर येऊन रास्ता रोको केला व या रास्ता रोकोमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. या रास्ता रोकोमुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर जवळपास 10 ते 15 मिनिटे वाहतूक कोंडी झालेली या ठिकाणी पाहायला मिळाली.
आंदोलन सुरू झाल्यानंतर काही वेळातच स्थानिक पोलीस या ठिकाणी येऊन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. केंद्र सरकारने केलेला या योजने विरोधात हे आंदोलन असून केंद्र सरकारने गरीब मुलांचा जर विचार केला नाही तर येत्या काळात मोठ्या प्रमाणात भव्य आंदोलन केंद्र सरकार विरोधात छेडले जाईल असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांनी दिलेला आहे.