अग्नीपथ ही नेहमीची भरती नाही, अतिरिक्त भरती आहे – फडणवीसांचा खुलासा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अग्नीपथ ही नेहमीची भरती नाही, अतिरिक्त भरती आहे – फडणवीसांचा खुलासा

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - केंद्रातील मोदी सरकारने लष्करातील भरतीसाठी 'अग्निपथ' ही नवी कंत्राटी योजना सुरु केली आहे. ज्यामुळे आता देशातील विविध भागात याविरोधात जोरदार आंदोलनं करण्यात येत आहेत. बिहारीमध्ये तर अनेक ठिकाणी रेल्वे जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे या योजनेबाबत लोकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. याचबाबत राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी या योजनेबाबत एक खुलासा केला.

अग्निपथ ही अतिरिक्त योजना आहे. लष्करासाठी जी नेहमीची भरती होते ती होणारच आहे. त्यामुळे ज्या काही थोड्या लोकांनी या योजनेला विरोध केला आहे तो फक्त गैरसमजुतीतून केला आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत यावेळी बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, रेग्युलर भरती काही बंद केलेली नाही. अग्निपथ ही योजना अतिरिक्त आहे. आमच्याकडे सैनिकी बाणा तरुणांमध्ये निर्माण झाला पाहिजे याकरिता तयार केलेली योजना आहे, असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे.

'अग्निपथ योजनेमध्ये चार वर्षापर्यंत त्यांना सैनिकी शिक्षण घेता येणार आहे. सैनिकांचं काम करता येणार आहे 21 वर्षाच्या आतल्या वयोगटातील मुलांना हे करायचं आहे. त्यांना खूप मोठ्या प्रमाणात रिमूनेशनर मिळणार आहे. 4 वर्षानंतर लम्पसम अमांउट देखील मिळणार आहे. त्यातील जे सैन्यात जाण्यास इच्छुक असतील अशा लोकांना सैन्यात प्राधान्यही मिळणार आहे.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारची ही योजना कशी योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.