भाजपचा तीन मतदारांच्या मतदानावर आक्षेप; मते बाद करण्याची मागणी

भाजपचा तीन मतदारांच्या मतदानावर आक्षेप; मते बाद करण्याची मागणी

पराग आळवणी व अतुल सावे यांनी जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुहास कांदे यांच्या मतदान प्रक्रियेवर भाजपने आक्षेप घेतला आहे. भाजपने लिखित स्वरूपात इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली आहे. भाजपच्या पोलिंग एजंटचं म्हणणं आहे की, नियमाप्रमाणे मतदाराने आपल्या पोलिंग एजंटला ठराविक अंतरावरून आपली मतपत्रिका दाखवायची असते. परंतु जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुहास कांदे यांनी आपली मतपत्रिका पोलिंग एजंटच्या हातात दिली. तसेच एका मतदाराने इतर पक्षांच्या पोलिंग एजंटलाही दिसेल अशा पद्धतीने मतपत्रिका दाखवली आहे. त्यामुळे त्यांचे मत बाद ठरवावे असे म्हटले आहे. या पूर्वी असा प्रकार गुजरातमध्ये घडला होता त्या वेळी ते मत बाद करण्यात आले होते. त्यामुळे काँग्रेसचे अहमद पटेल .5 मतांनी निवडून आले होते. मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असते. ते पाहून निर्णय घेण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी आहे. दाद न मिळाल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे भाजपने म्हटले आहे.