उद्योजकांच्या पुनर्वसनासाठी पालिका उभारणार इमारत कोट्यवधी रुपयांच्या कामाला आयुक्तांची मान्यता

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

उद्योजकांच्या पुनर्वसनासाठी पालिका उभारणार इमारत कोट्यवधी रुपयांच्या कामाला आयुक्तांची मान्यता

पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - भोसरी एमआयडीसी येथील आरक्षण 40 प्लॉट नंबर 201 येथे उद्योजकांच्या पुनर्वसनासाठी इमारत बांधण्यात येणार आहे. या कामाला पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍तांनी मंजुरी दिली आहे.

तृतीयपंथी समुदायासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे, वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्थेसाठी तात्पुरत्या स्वरुपात कनिष्ठ निवासी व वैद्यकीय अधिकारी पदाच्या नियुक्तीस कार्योत्तर मान्यता देण्यासह भोसरी एमआयडीसीमधील आरक्षण 40 प्लॉट नं. 201 येथे उद्योजकांच्या पुनर्वसनासाठी इमारत बांधणे, या कामांतर्गत अग्निप्रतिबंधक यंत्रणा व विद्युत विषयक कामे करण्याकामी  येणाऱ्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्‍यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज मंजुरी दिली. प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. नाशिक फाटा येथील भारतरत्न जे. आर. डी. टाटा व मधुकर पवळे तसेच भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील रंगीत दिव्यांची देखभाल व दुरूस्ती करणे, रावेत येथील रेल्वे उड्डाणपुलालगत असलेला सेवा रस्ता विकसित  करणे व अनुषंगिक कामे करण्यास सुधारीत मान्यता देण्यात आली.