राज्यसभा निवडणूक : २३८ आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राज्यसभा निवडणूक : २३८ आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्यसभा निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान सुरू आहे. आतापर्यंत एकूण आमदारांपैकी २३८ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. आतापर्यंतच्या मतदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा आमदारांनी शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांनी पहिल्या पसंतीचं मत दिलं आहे.

मुंबई, (प्रबोधन न्यूज) –  राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. विधानभवनात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीचे आमदार टप्याटप्प्याने मतदानासाठी हजेरी लावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वप्रथम मतदान केले. त्यानंतर आतापर्यंत ५० टक्के आमदारांनी राज्यसभेसाठी मतदान केले आहे. शिवसेनेच्या बहुतांश आमदारांचे मतदान अद्याप बाकी आहे.

महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणूक होतेय. शिवसेना आणि भाजपने सहाव्या जागेसाठी उमेदवार दिली आहे. धनंजय महाडिक (भाजप) आणि संजय पवार (शिवसेना) यांच्यात सहाव्या जागेसाठी लढत होणार आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्या आमदारांना एकत्रित आणून तटबंदी केलीये. त्यामुळे या चारही राज्यात कळीच्या ठरलेल्या प्रत्येकी एका जागेवर कोण बाजी मारणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपचे आमदार विधान भवनात दाखल झाले असून, उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असून, सहाव्या जागेवर कोण निवडून येणार, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण आमदारांपैकी १० आमदारांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना प्रथम पसंतीचं मत दिलं आहे.

आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४५ आमदारांनी बजावला मतदानाचा अधिकार, तर भाजपच्या ५० आमदारांनीही केलं मतदान.

राज्यसभा निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यांना उच्च न्यायालयात दिलासा मिळावा, असे प्रयत्न आहेत़ परंतु, आघाडीचे दोन मतांचे गणित बिघडले. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मते मिळण्याचा महाविकास आघाडीला अंदाज होता, परंतु ठाकूरही साथ देण्याबाबत साशंकता आह़े. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक मतासाठी चुरस असणार आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही. विरोधी पक्षाकडून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांनी १०० टक्के विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. १०० टक्के आत्मविश्वास आहे, आमच्या मनात अजिबात धाकधूक नाही असं अनिल बोंडे यांनी विधीमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला तसं या निवडणुकीत कोणीतरी संजय जाणार हे नक्की आहे असंही विधान यावेळी त्यांनी केलं.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज होणाऱ्या निवडणुकीत राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ‘एमआयएम’ची दोन मते शिवसेनेसाठी अडचणीची ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. यादरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपण महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.