“ज्यांच्या अंगातच पाणी नाही ते काय रोज पाणी देणार”, दादांचा भाजपला टोला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

“ज्यांच्या अंगातच पाणी नाही ते काय रोज पाणी देणार”, दादांचा भाजपला टोला

पिंपरी (प्रबोधन न्यूज) - भाजपला पाच वर्षात आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवडकारांकरिता पाणी आणता आले नाही. ज्यांच्या अंगातच पाणी नाही ते काय रोज पाणी देणार आहेत. मी शहरवासीयांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करणार नाही. प्रश्न सोडविण्याची धमक, ताकद आमच्यात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 100 नगरसेवक निवडून द्या. शहरवासीयांना दररोज पिण्यासाठी पाणी देण्यासह सर्व प्रश्न मार्गी लावून दाखवतो, अशी हमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आज चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मेळावा झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल, मंगला कदम, माजी नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.

अजित पवार  म्हणाले की, मागील पाच वर्षात सत्ताधारी भाजपने कमिशन मिळणारी कामे केली. ज्यातून जास्त कमिशन मिळेल, ते काम करण्यात भाजपला रस होता. कुत्र्यांच्या नसबंदीत कमिशन मिळविले. साडेसहा कोटी रुपयांची कसली नसबंदी केली. ती ही लॉकडाऊनच्या कालावधीत, सोन्याचे उपकरण वापरले होते की काय नसबंदीत, असा सवालही त्यांनी केला. शहरात सध्या इव्हेंट सुरु झाले आहेत. जेसीबी, बोलोरो देत आहेत. यांचे काही खरे नाही. लबाडा घरचे अवतान आहे. जेवल्याशिवाय कळत नाही असे म्हणत भाजप आमदार महेश लांडगे यांनाही टोला लगाविला.