तुकोबांची पालखी परतली; पिंपरीत मुक्काम 

तुकोबांची पालखी परतली; पिंपरीत मुक्काम 
पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -      आषाढीवारीकरुन पंढरपूरहून परतीच्या मार्गावरील संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामासाठी आज (बुधवारी)पिंपरीगावात पोहचली. टाळ-मृदंगाच्या गजरात शहरवासीयांनी पालखीचे स्वागत केले. तुकोबांची पालखी शुक्रवारी देहूत परतणार असून पालखी सोहळ्याचा प्रवास पूर्ण होणार आहे. 

आषाढीवारीकरुन पंढरपूरहून परतीच्या मार्गावरील संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामासाठी आज संध्याकाळी साडेचार वाजता  पिंपरीगावात पोहचली. टाळ-मृदंगाच्या गजरात शहरवासीयांनी पालखीचे स्वागत केले. तुकोबांची पालखी शुक्रवारी  देहूत परतणार असून पालखी सोहळ्याचा प्रवास पूर्ण होणार आहे.पालखी सोहळ्यात  देहू संस्थांचे माजी अध्यक्ष बापूसाहेब मोरे देहूकर, विद्यमान अध्यक्ष पुरोश्त्त्म मोरे, पालखी सोहळा प्रमुख भांदास मोरे, धनंजय मोरे, दीपक मोरे, माणिक मोरे, राम मोरे आहेत. पालखी सोहळा आज पिंपरीत मुक्कामी असणार आहे. देहू येथे १४ जुलै रोजी दाखल होईल.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पालखी पिंपरीगावात पोहचली. मुख्य चौकात जोग महाराज प्रासादिक दिंडीचे स्वागत करण्यात आले. माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी पालखी सोहळा प्रमुख सुनिल मोरे व दिंडी प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.
पिंपरी गावातील भैरवनाथ मंदिर येथे पालखी मुक्कामाला राहणार असून उद्या गुरुवारी  सकाळी सात वाजता आकुर्डीकडे जाणार आहे.