देखावे पाहण्यासाठी उसळली गर्दी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

देखावे पाहण्यासाठी उसळली गर्दी
 पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -    अनंत चतुर्दशीला अवघे पाच दिवस शिल्लक राहिल्याने गणेश दर्शनासाठी भाविक बाहेर पडले.  गुरुवारी दि . 28 सप्टेंबर लाडक्या बाप्पाचे विसर्जन होणार असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी शहरासह आदी भागात गणेशभक्त  गर्दी  करू लागले आहेत .  त्यामुळे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. देखावे पाहण्यासाठी काही मंडळांच्या मंडपासमोर रांगा लागल्या होत्या. 
शहर व परिसरातील अनेक मंडळांनी यावर्षी वैविध्यपूर्ण देखावे सादर केले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली. घरगुती विसर्जनानंतर कालपासून गर्दीचा ओघ वाढत चालला आहे. आज आठवा दिवस असल्याने या गर्दीत वाढ झाली.
पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी, निगडी, काळभोरनगर येथे गर्दी उसळली होती. यंदा सामाजिक, धार्मिक, प्रबोधनात्मक अशा विविध विषयांवरील देखावे सादर करण्यावर मंडळांनी भर दिला आहे. शहरातील थेरगाव, वाकड, हिंजवडी या ठिकाणच्या मंडळांचे देखावे पाहण्यासाठीसुद्धा बहुतांश मंडळांनी विविध आकर्षक देखावे सादर केल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. हे देखावे लहानांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांना खिळवून ठेवत आहेत. देखाव्यासोबतच काही मंडळांनी जिवंत देखावे सादर केले असून हे देखावे गर्दी खेचत आहेत.