शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपळे सौदागर, (प्रबोधन न्यूज ) - पिंपळे सौदागर येथील बासुरी बँक्वेट हॉल याठिकाणी शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आयोजित दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच करियर मार्गदर्शन शिबीर कार्यक्रम संपन्न झाला .
या प्रसंगी मंतजी हरहरे यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले कि आज या गुणवंत विद्यार्थ्यांनी आयुष्याची पहिली पायरी यशस्वीपणे पार करून दाखवले आहे परंत दिल्ली अभी दूर हें....... आयुष्याच्या या प्रवासात एवढ्याश्या यशाने हरभडून न जाता किंवा यशाची हवा आपल्या मेंदूत घुसू न देता आपल्या समोर येणाऱ्या पुढच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे आणि अशी आव्हाने पेलण्यासाठी यापुढील प्रवासाला योग्य दिशा देण्याची नितांत गरज असते आणि ती गरज अश्या मार्गदर्शन शिबिरामार्फत पूर्ण होत असते .
यावेळी गौरव त्रिपाठी यांनी पुढील काळात कोणतेही क्षेत्र निवडतांना विद्यार्थ्यांसमोरील पर्याय व आव्हाने याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या मनात असलेल्या शंकाचे समाधान ही केले. साधारण ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित राहून या मार्गदर्शन शिबिराला सकारात्मक प्रतिसाद दिला.
व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना या पुढील काळात या स्पर्धात्मक जगात आपले आव्हान कसे टिकवता येईल याकडे सर्व विद्यार्थ्यांनी आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे अनमोल विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले .
आजची ही तरुण पिढी आपल्या उद्याच्या समाजाची तसेच या देशाचे उज्वल भविष्य आहे आणि या भविष्याचा पाया मजबूत करण्यासाठी , त्यांना एक योग्य दिशा देण्यासाठी आणि एका सुरक्षित हातात आपल्या देशाचे भविष्य देण्यासाठी , त्यांचे हात बळकट करण्यासाठी असे कार्यक्रमाचे आयोजन करण्याची गरज आहे असे विचार श्रीमती अश्विनीताई जगताप यांनी व्यक्त केले .
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक शत्रुघ्न काटे आणि प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारणी सदस्य हेमंत हरहरे ,आमदार श्रीमती अश्विनी जगताप , गौरव त्रिपाठी , भानुदास काटे पाटील , नगरसेविका निर्मलाताई कुटे, नगरसेवक चंद्रकांत नखाते , नगरसेवक मोरेश्वर शेडगे , बांधकाम व्यावसायिक वसंत काटे,ऍड.राजेश जाधव, श्रीमती प्रियांका अग्रहरी , डॉ पंकज वाणी(येवले), सुदाम कापसे, कैलास कुंजीर,संदिप काटे, संजय भिसे, प्रविण कुंजीर,गणेश झिंजुर्डे , भुषण काटे , बाळकृष्ण परघळे, शिवराज काटे , मनोज ब्राह्मणकर, श्रीमती सुप्रिया पाटील,श्रीमती शीतल पटेल,दिपक गांगुर्डे,श्रीसमिर देवरे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती उषा भारद्वाज आणि सागर बिरारी यांनी केले .