सोसायटी धारकाच्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सोसायटी धारकाच्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी - पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ आणिअपार्टमेंट महासंघ संस्था मर्यादित या गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेचे शाखा कार्यालय, चिखली येथे कोलोसस ग्रीन सिटी फेज -१ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ( जाधववाडी, चिखली) सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आला. सोसायटी धारकांच्या समस्या निवारण करण्यासाठी या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ मर्यादित यांचे गृहनिर्माण क्षेत्रातील चिखली शाखेचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा उपनिबंधक  नारायण आघाव, पुणे शहर विभाग  ६ च्या शहर उपनिबंधक शीतल पाटील, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष  सुहास पटवर्धन, तसेच संचालक सुभाष कर्णिक, ॲड कणाद लहाने, ॲड प्रकाश तोंडारे,  चारुहास कुलकर्णी, तसेच, चिखली शाखाध्यक्ष आशिष सातकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हा निबंधक नारायण अघाव म्हणाले की, बिल्डरने गृहनिर्माण केल्यानंतर सदनिकाधारकांचे जेवढे अधिकार आहेत तेवढेच काही कर्तव्य देखील आहे. परंतु, हेच बऱ्याच जणांना माहिती नाही. सदनिका मालकी मिळते पण सोसायटीमधील सर्वांनी एकत्रित येवून जास्तीत जास्त सोसायटी नोंदणी करून तसेच कन्व्हेयन्स डीड करून घ्यावे. जेणेकरून मूळ मालकाच्या नावे असलेली सोसायटीची जागा सोसायटीच्या नावे हस्तांतरित होईल. यासाठी बिल्डरकडे पाठपुरावा केला पाहिजेत.

पुणे शहर उपनिबंधक -६च्या शीतल पाटील म्हणाल्या की, जास्तीत जास्त सोसायट्या कशा नोंदणीकृत होतील यासाठी शासनाने मोहीम हाती घेतली आहे, पिंपरी चिंचवड परिसरातील सोसायटीधारकांनी हस्तांतरणासाठी / थकबाकी वसुली / पुनर्वसन / सोसायटी नोंदणी इत्यादी कामासाठी दापोडी (अशोक हॉटेल जवळ) असलेल्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन केले.

सुहास पटवर्धन म्हणाले की , पिंपरी चिंचवड परिसरातील सोसायटीधारकांच्या तक्रारीसाठी कोलासस ग्रीन सिटी फेज -१ सोसायटीमध्ये सुरू केलेल्या महासंघाचे कार्यालय पहिल्या व तिसऱ्या  गुरुवारी सायंकाळी ७ ते ९ मध्ये सहकार दरबारसाठी खुले राहील. यावेळी सोसायटीमधील नागरीकांनी तज्ञांसमोर तक्रारी निवारण करण्यासाठी प्रयत्न करावेत.

पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ मर्यादित ही संस्था गृहनिर्माण क्षेत्रातील निःपक्ष वाटचाल करणारी संस्था आहे. तसेच उपविधी मध्ये नोंद आहे की सर्व सोसायटीने पुढे जाऊन मार्गदर्शन मिळवण्यासाठी गृहनिर्माण महासंघ संस्थेचे सभासद घेणे अनिवार्य आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारुहास कुलकर्णी यांनी तर प्रास्ताविक व आभार आशिष सातकर यांनी मानले.

यावेळी नियुक्त केलेली समिती सदस्य किसन बावकर, ॲड. सचिन मोरे, राहूल गायकवाड, सचिन जरे, विजय महाजन, प्रमोद झाटे, सीए. अक्षय बाहेती, नितीन अकोटकर, दिनेश काकुळते, गणेश भुजबळ, संभाजी बालघरे, ॲड. नितीन कांबळे, लक्ष्मण इंदोरे आदी उपस्थित होते. तसेच, आजूबाजूच्या परिसरातील सर्व सोसायटी मधील समस्यांबाबत चर्चा विनिमय करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.