जाती धर्माच्या पलीकडे माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ आहे : सतीश राऊत
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतनचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
पिंपरी (प्रबोधन न्यूज) - ग्रामीण भागासह शहरी भागातही अनेक कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रतिकूल परिस्थिती असते. परंतु परिस्थितीपुढे हतबल न होता प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रयत्नांची पराकाष्टा करीत ध्येय साध्य करता येते. मी स्पर्धा परीक्षांना सामोरे गेलो. यश मिळाल्यानंतर ही आणखी उच्च प्रशासकीय पदासाठी नेहमी स्वतःला घडवत राहिलो. जाती धर्माच्या पलीकडे माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ आहे ही गुरुजनांची शिकवण नेहमी लक्षात ठेवून त्याचे आचरण करीत राहिलो त्यामुळेच मी माझ्या पदाला न्याय देवू शकतो असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी तसेच लेखक, कवी सतीश राऊत यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन विद्यालय (पीसीपी) येथे "जल्लोष २०२२" या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोप प्रसंगी राऊत बोलत होते. यावेळी पीसीटीईचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्या विद्या ब्याकोड, स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष प्रसाद जोशी, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, गिर्यारोहक गिरिजा लांडगे, राष्ट्रीय खेळाडू तेजल सोनवणे, विराज लांडगे, कलाकार उमेश गवळी, दीप्ती सोनवणे, विजय जोशी आदींसह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक तथा उपजिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या हस्ते विद्या आनंद, नरेंद्र देशमुख, विणा जसवाणी, धनंजय गवळी, तेजस्वी गाडे, नितीन सैद, सोमनाथ भालेराव, श्रेया यादव या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी "जल्लोष २०२२" या कार्यक्रमांतर्गत गाणी, नृत्य, पोवाडे, देशभक्तीपर गीते सादर केली. शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. स्वागत प्राचार्या विद्या ब्यकोड, प्रास्ताविक मल्हार ताजणे, सूत्र संचालन विशाखा क्षीरसागर, अथर्व गायकवाड आणि आभार निमिषा चित्रिव यांनी मानले.