कंटेनरने दुचाकीवरील चौघांना धडक दिली; आई आणि मुलीचा जागीच मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कंटेनरने दुचाकीवरील चौघांना धडक दिली; आई आणि मुलीचा जागीच मृत्यू

देहूरोड (प्रबोधन न्यूज) - जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांना कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. वाकड येथून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या किवळे पुलावर भीषण अपघात झाला.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एक कुटूंब वाकडकडून देहूरोडच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. किवळे येथून पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग सुरु होतो. त्या किवळे पुलावर दुचाकी आली असता एका कंटेनरने दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील कुटुंब रस्त्यावर पडले. त्यात आई आणि मुलीचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. तर वडील आणि आठ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले. वडिलांना पवना हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आणि आठ वर्षीय मुलावर किवळे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या भीषण अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. दुर्घटनेत एकाच वेळी मायलेकीने जीव गमावल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.