डेक्कन क्वीनचा 93 वा वाढदिवस उत्साहात साजरा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

डेक्कन क्वीनचा 93 वा वाढदिवस उत्साहात साजरा

पुणे, दि. 2 जून – पुणे - मुंबईदरम्यान दररोज रेल्वेने ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली दख्खनची राणीने (डेक्कन क्वीन) काल (बुधवार) 93 व्या वर्षात पदार्पण केले. रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षा शहा यांच्या माध्यमातून डेक्कन क्वीनचा 93 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, डेक्कन क्वीनचे प्रवाशी, रेल्वे प्रशासन आदी लोक यावेळी उपस्थित होते.

प्रवाशांनी दिला आठवणींना उजाळा

पुणे मुंबई प्रवास आपण सर्वांनी कधी ना कधी केला असणार. त्यातही तो डेक्कनक्वीनने केला असेल तर अजून स्पेशल असणार. तशीही डेक्कनमधून प्रवासाची खासियत काही न्यारीच ना!! चला तर आज आपल्या दख्खनच्या राणीच्या 93 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्यासंगे केलेल्या सफरीच्या आठवणीना उजाळा देऊया...तुम्हीही करणार ना आठवणी शेयर??

कामाच्या निमित्ताने अनेकदा माझा मुंबई-पुणे प्रवास चालायचा. सकाळी लवकर निघायचे..दिवसभर कामे आटोपून पुण्याला परतायचे ते डेक्कननेच हे ही ठरलेलं. त्यामुळेच व्हीटी ला डेक्कनक्वीन पकडण्यासाठी धावपळ देखील बरीच व्हायची. रात्रंदिवस सतत धावणार्‍या मुंबई नगरीला ही धावपळ नेहमीचीच असली तरी उकाड्याने हैराण झालेल्या, गर्दीने फुललेल्या लोकलमध्ये धक्के खाऊन घरी परतण्याची ओढ लागलेल्या माझ्यासारख्या घाटावरच्या पुणेकराचा जीव मात्र पार मेटाकुटीला आलेला असायचा. त्यात चुकून पास होल्डर बोगीत शिरलो तर सर्वांच्याच नजरा भिडणाऱ्या. या धावपळीत घाम पुसत एकदा आपल्या जागेवर स्थानापन्न झालो की मग आम्ही निश्चिंत व्हायचो.

'प्लॅटफॉर्म क्रमांक 9 पर खड़ी हुई रेल बंबई से पुणे जानेवाली 12123 डाउन डेक्कन क्वीन अपने निर्धारित समय पे रवाना हो रही है' हे शब्द कानावर पडत असायचे.. 'देरी से चल रही है' तिच्या बाबतीत अगदी क्वचितच ऐकायला मिळायचे. बरोब्बर 5.10 ला हिरवा झेंडा दाखवून शिट्टी पाठोपाठ भोंगा वाजला की पाठीला हलकासा धक्का  बसल्याचे जाणवायचे. जशी आमची क्वीन व्हीटी मधून झोकात बाहेर पडायची तसं बाजूच्या पटरीवरुन धावणारी 5.07 ची डोंबिवली फास्ट लगेच स्लो डाऊन होत दख्खनच्या राणीला म्हणायची 'हो ग बाई तू पुढे.. बराच लांबचा पल्ला गाठायचाय तुला.. उद्या पुन्हा भेटू '. आमची राणी सुद्धा लगेच जी सुटायची अन पाच मिनिटात गर्दीने फुललेल्या दादर स्टेशनमधून न थांबता सुसाट स्पीडमध्ये बाहेर पडत असे. चलते चलते तिने कष्टकरी चाकरमान्यांचा घेतलेला निरोप, रुळांवर  धावतांना होणारा खडखडाट कानात बराच काळ घूमत रहायचा.

शिट्टी मारत ठाणे, कल्याणला फ्लाइंग किस देत बायपास करत पुढे सरकायच हे ठरलेलं. कर्जतला आल्यावर तिला पाच मिनिटांची उसंत मिळायची. दिवाडकरच्या गरमागरम चुरचुरीत वड्याचा घमघमाट डब्यात पसरायला एवढा वेळ नक्कीच पुरेसा असायचा. दुसर्‍या इंजिनाचा टेकू घेऊन डेक्कनक्वीन निघायची संथगतीने घाटमाथ्यावर असलेल्या थंडगार खंडाळ्याकडे...

घाटातील सायंकाळचे वेळी तिचा प्रवास म्हणजे तर निसर्गसौंदर्याची वैविध्यपूर्ण उधळण पहाण्याची पर्वणीच ! बोगद्यातून बाहेर पडताना कधी ढगांची दुलई पांघरलेल्या दर्र्‍या नजरेस पडत, तर कधी सूर्याचं केशरी बिंब अलगदपणे डोंगराआड पहुडताना दिसायचं, हिरवाईने नटलेल्या डोंगरातून कोसळणारे शुभ्र धबधबे तर अवर्णनीयच तर विहारणार्‍या पक्षांचे थवे सुद्धा कधीकधी... डोळ्याचे पारणे फेडणारी ही मोहक दृश्य पहाताना मुंबईतील कामाचा थकवा कुठल्याकुठे दूर पळायचा. काहीही म्हणा पण बोरघाटातून रेल्वे आणणार्‍याना आपण यासाठी धन्यवाद द्यायला हवेत. धुक्याच्या चादरीत लपेटलेल्या खंडाळ्याला गाडी थांबली की मी  'छोटी सी बात' मधल्या आपल्या लाजाळू अमोल पालेकरचा रस्ता इकडेतिकडे कुठे दिसतोय का पहायचो.

इकडे डब्यात कुठे रमीचा डाव रंगलेला दिसायचा तर कुठे गाण्याच्या भेंड्या लागायच्या. कुणी कटलेट्सची चव चाखत असे तर कुणी चहावर तल्लफ भागवत असे. कुणी शब्दकोडे सोडवण्यात तर कुणी फिल्मफेयर चाळण्यात मग्न.. चोरट्या नजरा, किंचितसे धक्के तर नेहमीचेच... गप्पागोष्टी, हास्यविनोद अन डुलक्या यांची वैविध्यपूर्ण सरमिसळ पहात पहात लोकांची लगबग सुरू झाली की समजायचं खडकी आलं. तीन साडेतीन तासाचा प्रवास आटोपून आमचं शिवाजीनगर कधी यायचं ते कळतही नसे. पावले घराकडे वळताना हा सफरनामा निघायचा मग आठवणींच्या यार्डात विसाव्यासाठी!!

गेली 93 वर्षे..पाच पिढ्या डेक्कनक्वीन अशी धावत आहे..धावता धावता संदेश देत आहे..

चलना ही जिंदगी है..

चलती ही जा रही है..

गाडी बुला रही है..

सीटी बजा रही है..

असा हा माझा डेक्कन क्वीनचा प्रवास..म्हंटलं तर स्पेशल किंवा सर्वांसारखाच... 94 व्या वर्षी तितक्याच जोमाने धावताना तिच्या शताब्दीपूर्तीसाठी शुभकामना..