चौंडी (जामखेड) इथं 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव संपन्न

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

चौंडी (जामखेड) इथं 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव संपन्न
चौंडी (जामखेड) इथं 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव संपन्न
चौंडी (जामखेड) इथं 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव संपन्न
चौंडी (जामखेड) इथं 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव संपन्न
चौंडी (जामखेड) इथं 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव संपन्न
चौंडी (जामखेड) इथं 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव संपन्न
चौंडी (जामखेड) इथं 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव संपन्न
चौंडी (जामखेड) इथं 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव संपन्न
चौंडी (जामखेड) इथं 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव संपन्न

चौंडी (जामखेड), दि. 1 जून - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं जन्मस्थळ असलेल्या चौंडी (जामखेड) इथं 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती'च्या वतीने जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला शरद पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा वारसा चालवणारे भूषणसिंह राजे होळकर, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार बाळासाहेब आजबे, संजय मामा शिंदे, संग्राम भैय्या जगताप, निलेश लंके, माजी आमदार अनिल गोटे, माजी आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार नाना कोकरे, यांच्यासह राज्यभरातून आलेली मान्यवर मंडळी, नागरीक तसंच धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य, अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव, कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व समाजबांधव या सर्वांनी उपस्थित राहून अभिवादन केलं.

यावेळी शरद पवार यांच्यासह उपस्थित मंत्री महोदयांनी उत्सवासाठी राज्यभरातून आलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केलं. यावेळी रणिजित कोळेकर, निखिल खेमनार, हरेश सूळ, समाधान धुकतडे, वैभव धायगुडे, सोनाप्पा यमगर, रुखिमणी गलांडे, सचिन ढोले, प्राची उराडे या अधिकाऱ्यांचा यावेळी शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर सार्वजनिक स्वरूपात हा उत्सव साजरा झाला  आणि त्यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती', चौंडी ग्रामस्थ, कर्जत-जामखेड मतदारसंघातील नागरीक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले मान्यवर या सर्वांचं मोलाचं सहकार्य केलं.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं अतुलनीय कार्य पाहता चौंडी इथं त्यांचं एक भव्य म्युझियम असावं अशी अपेक्षा व्यक्त करताच पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी या कल्पनेला संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. शिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी शासनामार्फत दरवर्षी पंचवीस लाख रुपये देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. याबाबत कर्जत-जामखेडकरांच्यावतीने मी पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

या कार्यक्रमाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा चालवणारे भूषणसिंह राजे होळकर यांची उपस्थिती लाभणं, हेही या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, सावित्रिमाई फुले यांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांच्या विचारांची समाजाला नितांत गरज आहे. त्यामुळे त्यांचे हे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोचणं गरजेचं असून त्यासाठी आपल्या सर्वांना जयंती-पुण्यतिथी उत्सव, चर्चासत्र, वर्कृत्व किंवा निबंध स्पर्धा अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न आपण सर्वजण मिळून करुयात आणि या महापुरुषांना अपेक्षित असलेला समाज घडवण्यासाठी हातभार लावूयात असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.