देशाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात पुणे शहर सदैव योगदान देत राहील – राष्ट्रपती

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

देशाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात पुणे शहर सदैव योगदान देत राहील – राष्ट्रपती

पुणे, दि. 27 मे - महाराष्ट्राच्या भूमीवर संतांनी सामाजिक चेतना जागृत केली. गणपती उत्सवाचे स्वतंत्रता काळात योगदान अमूल्य राहिले आहे. भारतीय मूल्यांचे महत्व जगभरात मानले जात असून त्याचे अनुकरण करण्यात येऊ लागले आहे. देशाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात महाराष्ट्र आणि पुणे शहर सदैव योगदान देत राहील, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज व्यक्त केले.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी (125 व्या) वर्षाचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडले. यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ॲड प्रताप परदेशी, ॲड. शिवराज कदम उपस्थित होते.

महाराष्ट्राची संतपरंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांकडून स्थापित हिंदवी स्वराज्य, राज्यातील राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक परंपरांचा आढावा घेताना राष्ट्रपती कोविंद म्हणाले, महाराष्ट्र मध्यकाळापासूनच अग्रेसर राहिला आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, रामदास स्वामी आदींनी देशाचे आध्यात्मिक जीवन समृद्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली स्वराज्याची स्थापना किंवा मराठी सरदारांची अटकेपार स्वारी, याद्वारे विविधतेमध्ये एकतेचे अद्भुत उदाहरण मराठा सरदारांनी प्रस्तूत केले होते.

सामाजिक कामातही महाराष्ट्राने आघाडीची भूमिका बजावली. देशात स्थापन केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या संस्थापक सावित्रीबाई फुले, देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांनी या भूमीला पावन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमितून शोषित, वंचितांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी कार्य केले आणि ते एक आदरणीय व्यक्तीमत्व ठरले, असेही कोविंद यांनी नमूद केले.

कोविंद पुढे म्हणाले, दगडूशेठ हलवाई परिवारातर्फे स्थापिक गणपती मंदिराद्वारे स्व. दगडूशेठ हलवाई यांनी लोकमान्य टिळक यांच्यासमवेत गणेशोत्सवाची सुरुवात केली.हा उत्सव इंग्रज सरकारविरोधात राष्ट्रवाद तसेच सामाजिक सद्भावनेचा स्रोत म्हणून उदयास आला. या माध्यमातून दगडूशेठ परिवाराने देशाच्या राष्ट्रीय, राजकीय क्षेत्रात अमूल्य योगदान दिले.

सामाजिक तसेच धार्मिक कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टकडून केलेल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याची माहिती मिळून आनंद झाल्याचे राष्ट्रपती श्री. कोविंद यांनी सांगितले. निर्धन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अनाथालये तसेच वृद्धाश्रमामध्ये मोफत जेवण आदी अनेक कल्याणकारी कार्य या ट्रस्टकडून केले जाते. कोविड काळात गरजूंना भोजन वितरण तसेच मुस्लिम बांधवांकडून आपल्या जीवाची पर्वा न गरता अनेक कोविडमुळे मृत्यू पावलेल्या हिंदू रुग्णांवर अंतिम संस्कार केल्याचे समजले. अशा कार्यामुळे सामाजिक सद्भावना आणि एकात्मतेला वृद्धी मिळते, असेही ते म्हणाले.

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील म्हणाल्या, दत्त मंदिर भक्ताची आज इच्छा पूर्ण होत आहे. कारण, राष्ट्रपती कार्यक्रमास आले आहे. मंदिराची मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई दाम्पत्य यांनी सामाजिक कामात महत्वपूर्ण काम केले असून दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ही सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. या कार्यक्रमास राष्ट्रपती यांना आणण्याकरिता मंदिराचे ट्रस्टी ॲड. प्रताप परदेशी यांनी माझ्याकडे आग्रह धरला आणि त्याबाबत मी राष्ट्रपती यांच्याकडे आग्रह धरला आणि तो त्यांनी पूर्ण केला. कोविंद यांचा स्वभाव प्रसन्न, उत्साही, सौजन्यशील आहे. ज्याप्रमाणे दत्त तीन देवतांचे मूर्ती आहे त्याप्रमाणे राष्ट्रपती तिन्ही सुरक्षा दलांचे प्रमुख आहे.