पीएमपीएमएलचे जनरल मॅनेजर सुनिल गवळीसह निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पीएमपीएमएलचे जनरल मॅनेजर सुनिल गवळीसह निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

पुणे, दि. 1 जून - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सेवेतून माहे मे 2022 मध्ये सेवानिवृत्त झालेले पीएमपीएमएलचे जनरल मॅनेजर सुनिल गवळी, चिफ मेकॅनिकल इंजिनीअर सुनिल बुरसे व झोनल मॅनेजर कैलास गावडे यांचा पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुणेरी पगडी, तुळशीचे रोप, शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

पीएमआरडीएचे प्लॅनिंग कमिटीचे सल्लागार, पीएमटी'चे माजी चेअरमन, पीएमपीएमएल'चे माजी संचालक व पुणे महानगरपालिकेचे माजी सभासद अजित आपटे, पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.चेतना केरूरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार, पीएमपीएमएलचे जनरल मॅनेजर (अॅडमिन अॅण्ड एच.आर.) सुबोध मेडसीकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकलक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले, “आज सेवानिवृत्त होत असलेल्या या तिन्ही अधिकाऱ्यांचे काम प्रेरणादायी असून भविष्यात देखील त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा संस्थेच्या प्रगतीसाठी उपयोग होण्याच्या दृष्टीने त्यांनी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सहकार्य करावे."

पीएमआरडीएचे प्लॅनिंग कमिटीचे सल्लागार अजित आपटे म्हणाले, “पीएमपीएमएल ही लोकांची सेवा करणारी संस्था आहे. अशा संस्थेत काम करण्याची संधी अधिकाऱ्यांना मिळाली.या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना माझे सांगणे आहे की पीएमपीएमएलशी असलेली नाळ तुटू देऊ नका. पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्कात राहून विचारविनिमय करत रहा.” सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे म्हणाल्या, “आज पीएमपीएमएलचे जे अधिकारी सेवानिवृत्त झाले; त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्या प्रमाणेच काम करून संस्थेला प्रगतीपथावर न्यावे.”

सत्कारमूर्ती सुनिल बुरसे यांनी पीएमटी, पीसीएमटी ते पीएमपीएमएलच्या आजपर्यंतच्या प्रवासात झालेले अमुलाग्र व सकारात्मक बदल याबाबतचा लेखाजोखा मांडला. तसेच पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.चेतना केरूरे यांच्यासह आतापर्यंत पीएमपीएमएल'चा कार्यभार सांभाळणाऱ्या सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकान्यांचे त्यांनी केलेल्या मार्गदर्शन व प्रोत्साहनाबद्दल सेवानिवृत्त झालेल्या तिन्ही अधिकाऱ्यांनी आभार मानले.

कार्यक्रमास पीएमपीएमएलचे सर्व डेपो मॅनेजर, असि. डेपो मॅनेजर, डेपो मेंटेनन्स इंजिनिअर व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे यांनी केले तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी मानले.