सौरव महाकाळला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सौरव महाकाळला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक

पुणे, (प्रबोधन न्यूज) - पंजाबी गायक व काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर आठ शार्पशूटर्सनी गोळीबार केला होता. या हत्याकांडात महाराष्ट्राचे कनेक्शन असल्याचे दोन दिवसांपूर्वी पुढे आले होते. पुण्यातील दोन गुंडांचा या हत्याकांडाशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सौरव महाकाळ याला अटक केली आहे.

पंजाबी गायक व काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर आठ शार्पशूटर्सनी गोळीबार केला होता. या हत्याकांडात महाराष्ट्राचे कनेक्शन असल्याचे दोन दिवसांपूर्वी पुढे आले होते. पुण्यातील दोन गुंडांचा या हत्याकांडाशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सौरव महाकाळ याला अटक केली आहे.

दोन वर्षापासून खून केल्यानंतर संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ फरार झाले होते. हे दोघंही पंजाबमध्ये राहत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. हे दोघे ही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीमधले असल्याचे समोर आलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटीव्ही पाहून संतोष जाधवची माहिती सांगितली होती. संतोष जाधव हाच आरोपी असू शकतो, त्यावरून आज पंजाब पोलिसांनी ग्रामीण पोलिसांना विचारणा केली.

गायक सिद्धू मुसेवाला याच्यावर हल्ला करण्याकरता सचिन बिश्नोई गॅंगने महाराष्ट्र राज्यातून दोन शार्प शूटर बोलावले होते. संतोष जाधव आणि महाकाल नावाचे हे दोन शूटर होते. ज्यांनी मुसेवालावर गोळीबार केला, यांची नावे पंजाब पोलिसांनी जाहीर केली. मुसेवालांची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शूटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते. 2 महाराष्ट्रातले, 2 हरियाणातले आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता.