जेथे जाहली 'धक्काबुक्की', तेथेच आयोजिला 'सत्कार' ! किरीट सोमय्यांचे पुणे महानगरपालिकेत दणदणाटी स्वागत 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

जेथे जाहली 'धक्काबुक्की', तेथेच आयोजिला 'सत्कार' ! किरीट सोमय्यांचे पुणे महानगरपालिकेत दणदणाटी स्वागत 

पुणे -

आज एक हृद्य सोहळा 'याची देही,याची डोळा' पाहण्याचे भाग्य पुणे महानगरपालिकेच्या वास्तूला मिळाला ! ज्या पायरीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की झाली, त्याच पायरीवर ढोलताशांच्या दणदणाटात त्यांचे जंगी स्वागत आणि सत्कार करून पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी जणू शिवसेनेचा 'हिसाब बराबर' केला ! यावेळी भाजपाचे सभागृह नेते गणेश बिडकर आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी पालिकेबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

किरीट सोमय्या यांनी यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, 'ठाकरे सरकारने पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळ केला. पुण्यातील कोविड सेंटरचा ठेका मिळालेल्या कंपनीचा मालक चहावाला आहे. तसेच हा चहावाला केईएम रुग्णालयामागे असतो. संजय राऊत यांची ही बेनामी कंपनी आहे. पुणे महापालिकेने त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत चार कंत्राटे दिली.' 

याआधी काय घडलं होतं?
किरीट सोमय्या शनिवारी (५ फेब्रुवारी) आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर सोमय्या तेथून पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन स्विकारण्याची मागणी केली. मात्र, सोमय्यांनी हे निवेदन स्विकारलं नाही. यावर आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना तिथून बाजूला नेत गाडीत बसवले. पोलिसांनी किरीट सोमय्या यांना गाडीत बसवल्यानंतरही आक्रमक शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवरही हल्ला चढवला. काही कार्यकर्ते गाडीच्या समोर आले, तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या मागच्या बाजूने हल्ला केला होता.