अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा बौद्धिक मालमत्ता अधिकार असेल - स्वप्निल चौधरी

अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा बौद्धिक मालमत्ता अधिकार असेल - स्वप्निल चौधरी
अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा बौद्धिक मालमत्ता अधिकार असेल - स्वप्निल चौधरी
अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा बौद्धिक मालमत्ता अधिकार असेल - स्वप्निल चौधरी
अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा बौद्धिक मालमत्ता अधिकार असेल - स्वप्निल चौधरी

पीसीसीओईआर मध्ये यूजीकॉन प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केले संशोधन प्रकल्प

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - "बौद्धिक मालमत्ता अधिकार" क्षेत्र हे आगामी काळात देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असेल. यासाठी शेती आणि औद्योगिक क्षेत्रात अधिक वेगाने संशोधन होणे आवश्यक आहे. तसेच अधिक संशोधन आणि त्या संशोधनाचे "बौद्धिक स्वामित्व हक्क नोंदणी"  झाले पाहिजेत. या संशोधनाचा उपयोग ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीला आणि औद्योगिक क्षेत्रात तसेच शेतीच्या आधुनिकीकरणाला झाला पाहिजे. यासाठी नव अभियंत्यांना संशोधन क्षेत्रात मोठी संधी आहे असे प्रतिपादन ग्लोबल टेक्निकल सपोर्टचे संचालक स्वप्निल चौधरी यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) येथे "युजीकॉन २०२२" या वार्षिक प्रकल्प प्रदर्शनाच्या वेळी चौधरी बोलत होते. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मिनीताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील कार्यकारी संचालक डॉ. गिरिष देसाई, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या जर्नलचे प्रकाशन करण्यात आले.

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आधूनिक एअर कुलर, एअर कंडीशनर, संवर्धित आणि आभासी वास्तव (ऑगमेंटेड रिऍलिटी अँड व्हर्च्युअल रिऍलिटी), इलेक्ट्रिक टू व्हीलर, हायड्रोपोनिक फार्मिंग, ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम, रेल्वे सिग्नल सिस्टीम, वेस्ट मॅनेजमेंट ॲटोमॅटीक हँड ब्रेक, वादळ आणि पूर नियंत्रण प्रणाली, अत्यवस्थ रुग्ण व्यवस्थापन असे विविध संशोधनात्मक प्रकल्प सादर केले होते. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. स्वागत, प्रास्ताविक प्राचार्य डॉ. हरिश तिवारी, सूत्रसंचालन श्वेता कोपर्डे, आभार डॉ राहूल मापारी यांनी मानले.