बंगाली सिनेसृष्टीला हादरा, 15 दिवसांत 3 अभिनेत्रींची आत्महत्या
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. 27 मे - गेल्या 15 दिवसांत तीन अभिनेत्रींनी त्यांचे आयुष्य संपवले आहे. बंगाली मॉडेल आणि अभिनेत्री मंजुषा नियोगी हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मंजुषाची मैत्रीण आणि अभिनेत्री बिदिशा डे मजुमदार हिने आदल्या दिवशी म्हणजेच 26 मे रोजी आत्महत्या केली होती. यापूर्वी 15 मे रोजी अभिनेत्री पल्लवी डे हिचा मृतदेहसुद्धा तिच्या फ्लॅटमध्ये सापडला होता. नवोदित मॉडेल्स आणि अभिनेत्रींच्या आत्महत्येच्या बातमीने बंगाली इंडस्ट्रीत सर्वांनाच धक्का बसला आहे.
पश्चिम बंगालमध्ये, कोलकाता येथील पाटुली भागात मंजुषा नियोगी हिने तिच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आईचा दावा आहे की, दोन दिवसांपूर्वी तिची मैत्रीण आणि दुसरी मॉडेल बिदिशा डी मजुमदारच्या मृत्यूनंतर ती खूप नैराश्यात होती. ब्राइडल मेकअप फोटोशूटसाठी मजुमदार हा एक प्रसिद्ध चेहरा होता. शुक्रवारी मंजुषाचे पालक जेव्हा अभिनेत्रीला फोन करत होते तेव्हा ती कोणाच्याही फोनला उत्तर देत नव्हती. त्यानंतर मंजुषाला पाहण्यासाठी खोलीत गेले असता, तेथे अभिनेत्रीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन मॉडेलिंग आणि अभिनयात उगवता तारा असलेल्या बिदिशा डे मजुमदारने आत्महत्या केली आहे. बिदिशाने वयाच्या 21 व्या वर्षी आत्महत्या केल्याने तिचे कुटुंब आणि शेजारी यांना धक्का बसला आहे. हसतमुख मुलीने आत्महत्या का केली? हा प्रश्न त्यांना पडला आहे. ग्लॅमरच्या दुनियेत ती हळुहळू स्वत:ला प्रस्थापित करत होती. लहानपणापासूनच नृत्य, गाणे आणि चित्र काढण्याची आवड-2021 मध्ये, बिदिशाने अनिर्वेद चॅटर्जी दिग्दर्शित लघुपटातून पदार्पण केले. यात टॉलिवूडचा प्रसिद्ध चेहरा देवराज मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसला होता. कुटुंबातील सदस्यांच्या माहितीनुसार बिदिशाला लहानपणापासूनच नृत्य, गाणे आणि चित्र काढण्याची आवड होती. तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.
बिदिशाने आत्महत्येचा मार्ग का निवडला याचा पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. बिदिशाने मृत्यूसाठी कोणाला जबाबदार धरलेले नाही. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी नागरबाजार पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्रीच्या मैत्रिणींनी दिलेल्या माहितीनुसार, झारग्राममधील एका तरुणाचे बिदिशासोबत गेल्या चार महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. अनुभव बेरा नावाचा तरुण दुसऱ्या नात्यात अडकल्यावर विदिशा भावूक झाली होती. त्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचा दावा बिदिशाचे नातेवाईक करत आहेत.
टीव्ही शो ‘Mon Mane Na’ मध्ये मुख्य भूमिकेत असलेली बंगाली अभिनेत्री पल्लवी डे कोलकाता येथील गरफा येथील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय अभिनेत्रीने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. पल्लवीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. टेलिव्हिजन मालिका ‘Resham Jhanpi’ मध्ये भूमिका साकारून पल्लवी घराघरात प्रसिद्ध झाली. तिने टीव्ही प्रोजेक्ट ‘Ami Sirajer Begum’ मिळवला, ज्यात सीन बॅनर्जी मुख्य भूमिकेत होते. अभिनेत्री सध्या 'मोन माने ना' मध्ये मुख्य भूमिकेत होती. तिचे सहकलाकार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.