अनिल परबांवर ED ची कारवाई, अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. 26 मे - दापोली रिसॉर्टप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ED) राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले आहेत. याचबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'केंद्रीय यंत्रणांना जो अधिकार दिला आहे त्याचा ते वापर करतात. मागे पण अनेकांच्या बाबतीत इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यांच्याबाबतच्या कारवाया झालेल्या पाहिल्या आहेत. माझ्याही नातेवाईकांबाबत इन्कम टॅक्सने कारवाया केल्या आहेत.'
'तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी धाडी टाकलेल्या होत्या. जो काही त्यांना तपास करायचा होता तो त्यांनी केला. त्याचा अधिकार त्यांना आहे. यामध्ये आत्ताही कारवाई चालू आहे असं मला मगाशी काहींनी सांगितलं. परंतु कोणत्या बेसवर कारवाई चालू आहे हे माहित नाही. कारण मागे पण काही जणांनी सुतोवाच केले होते. अमक्याचा नंबर.. तमक्याचा नंबर.. अशाही गोष्टी काही जणं बोलतात आणि त्या पद्धतीने घडतं.'
'अशा यंत्रणेत कुणाचाही हस्तक्षेप न होता पारदर्शकपणे तपास केला गेला पाहिजे. तो अधिकार कायद्याने आणि नियमाने त्यांना दिला आहे. पण त्याचा गैरवापर होऊ नये एवढी माफक अपेक्षा आहे.'
'मी सकाळी सात वाजता इथे आलोय. जोपर्यंत दुसरी बाजू समजूनच घेतली नाही तर मी आज काही तरी बोलायचं आणि त्यातून तिसरंच काही तरी असायचं. मग पुन्हा ब्रेकिंग न्यूज. त्यामुळे मी बाकीची गोष्ट संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय सांगणार नाही.'
'राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांवर देखील याआधी अशीच कारवाई झाली आहे. पण कुठलीही कारवाई झाली की त्याला लगेच शिक्षा होते असं नाही. त्याला काही प्रोसस आहे.' असं अजित पवार यावेळी म्हणाले.