मी फक्त जनतेशी बांधील ! संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट व्हायरल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मी फक्त जनतेशी बांधील ! संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट व्हायरल

मुंबई, दि. 26 मे - शिवसेनेकडून कोल्हापूर येथील संजय पवार यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनी गुरूवारी फेसबुक व ट्विटरवर एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालेला त्यांचे छायाचित्र आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की,

महाराज...

तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय...

मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी...

मी बांधील असेन तो फक्त जनतेशी...

संभाजीराजे यांची ही फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. तासाभरातच 10 हजारांहून अधिक लोकांनी ही पोस्ट लाईक केली असून जवळपास 500 हून अधिक कमेंट आल्या आहेत. तसेच 200 जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ट्विटरवरही ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवर दावा सांगितला होता. या जागेवरून संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केली होती. त्यांनी महाविकास आघाडीने निवडणुकीत आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र, राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेच्या कोट्यातील असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांच्यापुढे पक्षप्रवेशाची अट ठेवली होती. मात्र, संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढण्यावर ठाम होते. त्यामुळे शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरमधील नेते संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता मावळली आहे.

संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार किंवा नाही, हे पाहवे लागेल. संभाजीराजे राज्यातील मराठा संघटनांच्या समन्वयकांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर संभाजीराजे पुढील भूमिका स्पष्ट करतील. संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवल्यास चुरस निर्माण होऊ शकते. महाविकासआघाडीने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचे ठरवले असले तरी ऐनवेळी संभाजीराजे यांच्या आवाहनला प्रतिसाद देत काही आमदार त्यांच्या पाठिशी उभे राहण्याची शक्यता आहे.