संजय राऊतांचे थुंकणे सापडले वादात

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

संजय राऊतांचे थुंकणे सापडले वादात

संजय राऊतांचे थुंकणे सापडले वादात

  मुंबई , (प्रबोधन  न्यूज ) -  आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे खासदार संजय राऊत अजून एका वादात सापडले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आमदार संजय शिरसाट यांचे नाव घेताच संजय राऊत वार्ताहराच्या माईकसमोर थुकले तर शुक्रवारी दुसऱ्यांदा दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत श्रीकांत शिंदे यांच्याबाबत विचारताच राऊत यांनी पुन्हा सलग तीच कृती केली. त्यामुळे राऊत यांची ही कृती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महाविकास आघाडीत घटकपक्षातील नेत्यानींही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.या प्रकारानंतर सावरासावर करत माझ्या जिभेला त्रास झाल्याने मी थुंकलो, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खासदार संजय राऊत दररोज माध्यमांशी संवाद साधताना शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार, खासदार यांच्यावर टीकेचे आसूड ओढत असतात.गुरूवारी संजय शिरसाठ यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारला असताना त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसमोर थुंकण्याचा प्रकार केला. श्रीकांत शिंदे यांनी एका कार्यक्रमात मुंबईतील एक कुटुंब उन्हाळ्यात गारव्यासाठी परदेशात जात असते, अशी टिका उद्धव ठाकरे यांच्यावर केली.या वक्तव्याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी पुन्हा त्या प्रश्नावर थुंकण्याचा प्रकार केला.

'थुंकण्यावर बंदी आहे का? असेल तर सरकारने तसा अध्यादेश काढावा. माझ्या जिभेला त्रास झाला, माझ्या घरात मी होतो. माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो. कुणाला वाटत असेल त्यांच्या नावाने थुंकलो हा त्यांचा प्रश्न आहे. काही लोकांचं नाव आलं आणि जीभ दाताखाली आली.

- संजय राऊत, खासदार