अनिल परव यांच्याशी संबंधीत सात ठिकाणी ईडीची छापेमारी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. २6 मे - राज्याचे परिवहन मंत्री अनिल परव यांच्याशी संबंधीत सात विविध ठिकाणी ईडीने आज (गुरुवार) सकाळी छापेमारी सुरु केली आहे.
मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ही छापेमारी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सीआरझेडचे उल्लंघन करत हे रिसॉर्ट बांधल्याचा दावा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडे तक्रार केली होती. त्यानंतरच ईडीने ही कारवाई केल्याचे दिसत आहे.
मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी सकाळी ७ वाजल्यापासून ईडीची रेड सुरू आहे. अनिल परब यांच्या खासगी निवासस्थान, शासकीय निवासस्थानासह पुणे, दापोली आणि मुंबई अशी एकुण ७ ठिकाणी कारवाई सुरु आहे. जवळपास ४ अधिकाऱ्यांकडून ही कारवाई सुरू आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेकडे तक्रार दाखल केली होती. सोमय्या म्हणाले की, "बेनामी मालमत्ता, मनी लाँड्रिंग, शेल कंपन्या, पर्यावरण मंत्रालय, FEMA उल्लंघनासाठी ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांवर कठोर कारवाईची अपेक्षा आहे असं सोमय्या म्हणाले. तसेच अनिल परब, यशवंत जाधव, हसन मुश्रीफ, कंपनी, मंत्रालय ROC यांची आयकर विभाग, पर्यावरण मंत्रालय, ED, FEMA द्वारा चौकशी करुन कारवाई केली जावी असंही सोमय्या म्हणाले आहेत. यशवंत जाधव यांच्या दुबई कनेक्शनचीही ईडीने चौकशी केली अशी माहिती सोमय्यांनी दिली.
अनिल परबांवर ईडीच्या धाडीनंतर किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांना डिवचलं आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परब यांनी कपड्यांची बॅग भरून ठेवावी असा इशारा त्यांनी अनिल परब यांना दिला आहे.
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी ३१ जानेवारी २०२२ ला रत्नागिरीच्या दापोली येथील साई रिसॉर्ट एन एक्स आणि सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. ९० दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, ९० दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसूली प्रकरणाची चौकशी करणारे तपास अधिकारी कासिम सुलतान हे अनिल परब यांची चौकशी करत आहेत.