नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड, लाठ्या-काठ्यांनी केले प्रहार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
![नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड, लाठ्या-काठ्यांनी केले प्रहार](https://prabodhannews.com/uploads/images/2022/05/image_750x_628f1f530a2e5.jpg)
भोपाळ, दि. 26 मे - मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात शहरातील चौकात असलेल्या माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची काही लोकांनी तोडफोड केली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
व्हिडिओ शेअर करताना कमलनाथ यांनी लिहिलं, "हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील आहे. ज्यात काही समाजकंटक देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची विटंबना करताना दिसत आहेत. ही घटना अत्यंत निंदनीय आहे." व्हिडिओमध्ये दिसतं, की काही समाजकंटक नेहरूंच्या पुतळ्यावर काठीने हल्ला तसंच दगडफेक करत आहेत.
पोलिसांनीही या घटनेची दखल घेतली आहे. सतना शहरातील सह जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धवरी चौकात ही घटना घडली आहे. व्हिडिओमध्ये पुतळ्याची तोडफोड करणारे उपद्रवी शिवराज सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. तसंच ते जवाहरलाल नेहरूंच्या पुतळ्यावर लाठीमार आणि दगडफेक करत होते.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बुधवारी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेहरू पुतळ्याजवळ धरणे आंदोलनाला बसले. यानंतर सीएसपीसह कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. सध्या काँग्रेस पक्षाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, याशिवाय काही संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.