संभाजीराजेंनी शिवसेना प्रवेश धुडकावला; शिवसेना आमदारांची मते फुटणार ?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

संभाजीराजेंनी शिवसेना प्रवेश धुडकावला; शिवसेना आमदारांची मते फुटणार ?

मुंबई, दि. 23 मे - संभाजीराजे छत्रपती राज्यसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यास ठाम आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने दिलेली प्रवेशाची ऑफर त्यांनी धुडकावली आहे. शिवसेनेच्या गोटातील काही आमदारांचा संभाजीराजे यांच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे. संभाजी राजे मुंबईहून कोल्हापूरला रवाना झाले आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा उमेदवारी नाकारणे आपल्याला राजकीयदृष्ट्या परवडणार नाही, अशी चर्चा या आमदारांमध्ये सुरु असल्याचं समजतंय. त्यामुळे १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत हे आमदार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने संभाजीराजे यांच्यासमोर सहावा उमेदवार रिंगणात उतरवला तर तो निवडून येईल की नाही, याबाबत शंका आहे. तर दुसऱ्या बाजूला संभाजीराजे यांचा पराभव झाला तर छत्रपती घराण्यातील व्यक्तीचा पराभव केला म्हणून मराठा समाज नाराज होण्याची शक्यता आहे.

संभाजीराजे यांच्यासाठी मराठा मोर्चा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढारे यांनी आज दुपारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत एखादा महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. मराठा समन्वयकांशी संभाजीराजे छत्रपती चर्चा करणार असल्याची माहिती आहे. मोर्चा समन्वयकांनी रविवारी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी समन्वयकांनी राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने संभाजीराजे यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी पवारांना केली आहे. यापूर्वी शरद पवारांनी राष्ट्रवादीची उरलेली जादा मते शिवसेनेच्या उमेदवाराला देणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी म्हटले आहे की, संभाजीराजे छत्रपती यांनी यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली. जेव्हा कुणी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करतो तेव्हा त्यांनी मतांची बेगमी केलेली असते. जिंकून येण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता असते. ज्यावेळी त्यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली त्यावेळी त्यांना कुणी पाठिंबा दिला असेल काय झाले असते ते माहित नाही. त्यात पडणे आमचे काम नाही.

त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली. पण, असे लक्षात आले की त्यांच्याकडे मते नाहीत. त्यांनी आमच्याकडे मते मागितली. परंतु, शिवसेनेच्या दोन जागा असताना आम्ही अपक्ष उमेदवार यांना पाठिंबा का द्यावा? यासाठी त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली.