भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांना अटक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
2 महिन्यात खुर्ची गेली; घेत होते 1 टक्का कमिशन
चंदीगढ, दि. 24 मे - पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारचे आरोग्य मंत्री डॉक्टर विजय सिंगला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सिंगला यांच्यावर आरोग्य विभागातील प्रत्येक काम व टेंडरच्या मोबदल्यात 1 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप आहे. याची तक्रार खुद्द मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यांनी गुप्तणे या प्रकरणाची चौकशी केली. अधिकाऱ्यांची विचारपूस करुन सिंगला यांना पाचारण केले. मंत्र्याने चूक मान्य केल्यानंतर त्यांची हकालपट्टी केली.
त्यानंतर काही वेळातच पंजाब पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने सिंगला यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही केली. आता त्यांची आम आदमी पार्टीतूनही हकालपट्टी करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
सीएम भगवंत मान म्हणाले -'माझ्यापुढे एक प्रकरण आले. त्यात माझ्या सरकारचा एक मंत्री प्रत्येक निविदा किंवा त्या विभागाच्या खरेदी व्यवहारांत एक टक्के कमिशन मागत होता. या प्रकरणाची केवळ मला माहिती आहे. याची विरोधी पक्ष व माध्यमांना कोणतीही माहिती नाही. माझी इच्छा असती तर मी हे प्रकरण दाबून टाकले असते. पण, यामुळे जनतेचा विश्वासघात झाला असता. मी त्या मंत्र्याविरोधात कठोर कारवाई करत आहे. त्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करत आहे. मी या प्रकरणी पोलिसांनाही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.'