दहा वर्षे पंतप्रधान झालात आणखी काय हवंय ? मोदींना असं कोणी म्हटलंय ?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दहा वर्षे पंतप्रधान झालात आणखी काय हवंय ? मोदींना असं कोणी म्हटलंय ?

नवी दिल्ली, दि. 13 मे - गुजरातमधील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षातील एका बड्या नेत्यानं सल्ला दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. देशानं तुम्हाला दोनदा पंतप्रधान बनवलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला आणखी काय हवं, असा सल्ला या नेत्यानं मोदींना दिला होता. पण मोदींनी या नेत्याचं नाव सांगितलं नाही.

कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, एकदा एक ज्येष्ठ नेते मला भेटले. ते राजकीयदृष्ट्या सतत आमच्या विरोधात असतात. पण मी त्यांचा आदर करतो. काही मुद्यांवर ते निराश होते. त्यामुळे ते मला भेटायला आले होते. भेटीत ते मला म्हणाले, देशाने तुम्हाला दोनदा पंतप्रधान बनवलं, त्यामुळं आता आणखी काय हवं?

या नेत्याचं मत असं होतं की, जर कोणी दोनवेळा पंतप्रधान बनले असेल तर त्यांनी सर्वकाही मिळवलं, असं मोदी यांनी पुढे बोलताना सांगितले. माझं स्वप्न कल्याणकारी योजनांचा शंभर टक्के फायदा लोकांपर्यंत पोहचवणे हे आहे. त्यांना माहिती नाही की, मोदी कोणत्या मातीचे बनले आहेत. गुजराच्या भूमीने मला बनवले आहे, असंही मोदी म्हणाले.

जे काही झालं ते झालं, आता मला आराम करायला हवा, या गोष्टींवर माझा विश्वास नाही. तुम्हाला मला आठ वर्षांपूर्वी गुजरातमधून दिल्लीत पाठवले आहे. ही आठ वर्षेला सेवा, गरीबांचे कल्याण आणि सुशासन याला वाहून घेतली असल्याचे मोदींनी सांगितले.