कुलगाममध्ये बँकेत घुसून व्यवस्थापकाची हत्या, ४८ तासांत दुसरी घटना (व्हिडिओ)

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कुलगाममध्ये बँकेत घुसून व्यवस्थापकाची हत्या, ४८ तासांत दुसरी घटना (व्हिडिओ)

सामना अग्रलेखात राऊत यांनी केंद्र सरकारचे काढले वाभाडे

श्रीनगर, दि. 2 जून - जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. दहशतवाद्यांनी आता बँकेत घुसून मॅनेजर विजय कुमारची गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्यानंतर विजय कुमार यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारीच कुलगाममध्येच दहशतवाद्यांनी सरकारी शाळेतील शिक्षिका रजनी बाला यांची गोळ्या झाडून हत्या केली. यापूर्वी बडगाममध्ये तहसील आवारात घुसून कर्मचारी राहुल भट यांची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून काश्मिरी पंडितांचे आंदोलन सुरू असून त्यांना स्वत:ची सुरक्षा स्वत:च ठरवायची आहे. त्यांनी प्रशासनाकडे शस्त्रे बाळगण्याची परवानगी मागितली आहे.

बँक मॅनेजरची अशा प्रकारे हत्या केल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील स्थानिक हिंदू अल्पसंख्याक आणि स्थलांतरित लोकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून टार्गेट किलिंगच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. एखाद्या नागरिकाची किंवा कर्मचाऱ्याची अशा प्रकारे हत्या झाल्याची गेल्या 5 महिन्यांतील ही 17वी घटना आहे. बुधवारीच जम्मू-काश्मीर प्रशासनाने हिंदू आणि शीखांना सुरक्षित ठिकाणी पोस्टिंग देण्याचे बोलले होते, मात्र आता या प्रकरणाने चिंता वाढवली आहे. वास्तविक, बँकेत घुसून खून करण्याच्या या प्रकारामुळे परप्रांतीय आणि अल्पसंख्याक कुठे सुरक्षित आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'दहशतवादी स्थानिक गावातील बँकेच्या शाखेत घुसले आणि त्यांनी व्यवस्थापकाला गोळ्या घातल्या. या बँकेची शाखा आरे मोहनपोरा परिसरात आहे. मृत बँक व्यवस्थापक राजस्थानातील हनुमानगड जिल्ह्यातील आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की विजय कुमारला गोळी लागल्याने रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. 3 जून रोजी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि एलजी मनोज सिन्हा यांची बैठक होणार आहे. या बैठकीत ते काश्मीरमधील टार्गेट किलिंगचा आढावा घेऊ शकतात. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह देखील उपस्थित राहू शकतात.

या हत्याकांडानंतर जम्मू विभागात निदर्शने सुरू झाली असून सरकारला काही उपाय योजावे लागतील असे लोकांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर ते म्हणाले की, सरकार सुरक्षित पोस्टिंगबद्दल बोलत आहे, पण काश्मीरमधील कोणतीही जागा आमच्यासाठी सुरक्षित नाही. जम्मूमध्ये सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले असून, त्यांना त्यांच्या जिल्ह्यातच पोस्टिंग देण्यात यावी. प्रसारमाध्यमांशी बोलताना काही आंदोलकांनी सांगितले की, प्रशासन म्हणते की काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात हिंदूंना पोस्टिंग दिली जाईल, परंतु सध्या कोणतीही जागा सुरक्षित नाही. आमची मागणी आहे की आम्हाला जम्मू विभागाबाहेर पाठवू नका आणि होम जिल्ह्यातच पोस्टिंग करण्याचा प्रयत्न करा.

या दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांवरून शिवसेनेने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकांचा भडीमार केला आहे. काश्मिरी पंडितांवर हल्ले होत असून केंद्रात आणि जम्मू-काश्मीरमध्येही सत्ता असताना काश्मीर अशांत का? असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये उद्योग उभे राहतील, व्यवसाय सुरू होतील, स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, प्रामुख्याने विस्थापित काश्मिरी पंडितांची ‘घरवापसी’ होऊन त्यांना त्या ठिकाणी सुरक्षित जीवन जगता येईल, जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा पूर्वीचे ‘नंदनवन’ अवतरेल असे एक चित्र उभे केले गेले. मागील दोन वर्षांत जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती कशी सुरळीत होत आहे, दहशतवाद्यांचे कसे कंबरडे मोडले आहे, अशा वल्गना केल्या गेल्या. आपल्या लष्कराने या काळात अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, दहशतवाद्यांच्या कारवायांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. मे महिन्यात १५ चकमकींमध्ये २७ दहशतवाद्यांचा खात्मा केला हे खरेच, पण दुसऱ्या बाजूला दहशतवादी हल्ल्यामध्ये जवान शहीद होतच आहेत. निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत. चारच दिवसांपूर्वी आमरिन भट या कश्मिरी पंडित अभिनेत्रीची गोळ्या घालून हत्या केली गेली. त्याआधी बडगाम जिल्हय़ात चडुरा तहसील कार्यालयात घुसून राहुल भट या कर्मचाऱ्याला गोळ्या घातल्या गेल्या, असा उल्लेख अग्रलेखात केला गेला आहे.

१९९० च्या दशकात कश्मिरी पंडितांच्या नशिबी आलेल्या विस्थापनाबद्दल, त्यांच्या शिरकाणाबद्दल काँग्रेस आणि इतर पक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारेच मागील आठ वर्षांपासून केंद्रात सत्तेत आहेत. जम्मू-कश्मीरमध्येही राज्यपाल राजवट म्हणजे केंद्राचीच सत्ता आहे. मग तरीही जम्मू-कश्मीर अशांतच का आहे?, असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.

तसेच, दहशतवाद्यांकडून होणारे ‘टार्गेट किलिंग’ थांबले का नाही? हिंदू, शीख, पंडित यांच्यासह स्थानिक मुस्लिमांच्या खुलेआम हत्या कशा सुरू आहेत? विद्यमान सरकारने दिलेल्या आश्वासनांचे बुडबुडे निरपराधांच्या रक्ताने लाल का होत आहेत? कालपर्यंत या प्रश्नांचा जाब तुम्ही मागील राज्यकर्त्यांना विचारीत होता. आज तुम्हालाही या प्रश्नांचा ‘जवाब’ द्यावा लागेल. कारण तुमच्याही राजवटीत काश्मीरमधील हत्यासत्र सुरूच आहे आणि ‘‘सामूहिक स्थलांतर करू’’ असा अल्टिमेटम देण्याची वेळ कश्मिरी पंडितांवर आली आहे, असे म्हणत शिवसेनेने केंद्र सरकावर निशाणा साधला आहे.

पाहा व्हिडिओ -

https://twitter.com/i/status/1532258269191733248