ठरलं, संजय पवार हेच असतील शिवसेनेचे राज्यसभेसाठी उमेदवार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. 24 मे - राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून संजय पवार यांना उमेदवारी देण्याचं शिवसेनेने निश्चित केलं आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना माहिती दिली. अधिकृत घोषणा लवकरच होईल अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत, दोन्ही जागेवर शिवसेनेचे उमेदवार लढतील आणि दोन्ही जागेवर शिवसेनेचे उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरचे संजय पवार हे शिवसेनेचे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत, कडवट शिवसैनिक आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेचा विषय शिवसेनेसाठी बंद झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आता संभाजीराजे भोसले काय करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेनेकडून राज्यसभेची दुसरी जागा लढवण्यात येणार आहे. या जागेसाठी संभाजीराजे इच्छुक आहेत. मात्र, शिवबंधन बांधा आणि उमेदवारी घ्या, अशी अट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातली. संभाजीराजेंनी त्यास नकार देत पुरस्कृत करण्याची विनंती केली. याला शिवसेना तयार नव्हती. यातून संभाजीराजेंना पर्याय म्हणून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत खैरे यांच्यासह आणखी एक आश्चर्यकारक नाव चर्चेत आलं होतं. संजय पवारांचे नाव चर्चेत आल्याने त्यांच्याविषयी उत्सुकता वाढली होती. कोल्हापूर शहरातून विधानसभा लढण्यासाठी गेले २० वर्षे तयारी करणारे, प्रत्येकवेळी उमेदवारीची चर्चा होणारे, मात्र प्रत्यक्षात ती न मिळणाऱ्या पवारांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
३३ वर्षापूर्वी म्हणजे १९८९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर तीन वेळा ते कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. एकदा विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांना संधी मिळाली. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढणारा नगरसेवक अशी त्यांची महापालिकेत ओळख होती. यामुळे पवार हे तीन वेळा तीन वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले. शहराच्या सर्वच प्रश्नावर आंदोलन करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असे. त्यामुळे लढाऊ कार्यकर्ता, कट्टर शिवसैनिक अशी पवारांची कायमची ओळख. भाजप, काँग्रेसने अनेकदा त्यांना आमिष दाखवत पक्षात घेण्याचा प्रयत्न केला, पण शिवसैनिक ही ओळख कायम ठेवण्यातच पवारांनी आनंद मानला.
संजय पवारांचे नाव गेले २० वर्षे कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून घेतले जाते. पण प्रत्यक्षात त्यांना संधी मिळाली नाही. सुरेश साळोखे आणि राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली आणि ते दोन दोन वेळा निवडूनही आले. यामुळे पवारांना आमदार होता आलं नाही. करवीर तालुका प्रमुख, चार वर्षे शहरप्रमुखपदी काम केलेले पवार गेली १४ वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. युतीचे सरकार असताना आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्षपदीही त्यांना संधी मिळाली. राज्यमंत्रिपदाच्या दर्जाचे हे पद होते. पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांचे हे पद गेले.
गेले ३३ वर्षे कट्टर शिवसैनिक असणाऱ्या संजय पवारांचे नाव थेट राज्यसभेचा उमेदवार म्हणून चर्चेत आले आहे. शिवसेनेने अनेकदा सामान्य कार्यकर्त्याला संधी देत धक्कातंत्राचे राजकारण केले आहे. यामध्ये आता पवारांची वेळ आली आहे. त्यांना जर संधी मिळाली तर सेनेत सामान्य शिवसैनिकही मोठा होऊ शकतो याचा नवा पुरावाच मिळेल, असं बोललं जात आहे.
दरम्यान, राज्यसभेसाठी आपल्या नावाचा विचार होत असल्याचे बातमी कळाली. मनाला अतिशय आनंद झाला. सामान्य शिवसैनिकाला एवढे मोठे पद देण्याचा विचार होत असल्याने पक्षाविषयी असलेला आदर आणखी वाढला आहे, अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली आहे.