निवडणुकीची काळजी करू नका, मी आहे; गिरीश बापटांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

निवडणुकीची काळजी करू नका, मी आहे; गिरीश बापटांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

पुणे (प्रबोधन न्यूज) - गिरीश बापट यांनी यावेळी कसब्याची चिंता करू नका. मी इथे बसलोय, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घोले रोड परिसरातील महात्मा फुले कला दालनात खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. एकनाथ शिंदे यांनी बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बापट आता या निवडणुकीत आता स्वतः लक्ष घालणार आहेत. त्यामुळे भाजपसाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, कसब्याच्या निवडणूकीबद्दल गिरीश बापट त्यांनी स्वतःच मला सांगितले. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील. कसब्याची चिंता करू नका. मी इकडे बसलो आहे. आपले मोठे नेटवर्क आहे. कामाला लागलो आहे, असा विश्वास बापट यांनी यावेळी दिला. या निवडणुकीत दोन्ही जागेवर भाजपचे उमेदवार निवडून येणार आहेत, असा दावा शिंदे यांनी केला.

खासदार गिरीश बापट आजारपणामुळे काही दिवसांपूर्वी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार आदींनी बापट यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वीच बापट यांना घरी सोडण्यात आले.