प्राणीमात्रांमध्ये आत्मरुपाने असलेल्या परमेश्वराची पूजा व्हायला हवी  धाराशिव येथील संत गोरोबाकाका मंदिराचे ह.भ.प.पद्मनाभ महाराज व्यास

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

प्राणीमात्रांमध्ये आत्मरुपाने असलेल्या परमेश्वराची पूजा व्हायला हवी  धाराशिव येथील संत गोरोबाकाका मंदिराचे ह.भ.प.पद्मनाभ महाराज व्यास

 श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन, कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन

पुणे , (प्रबोधन न्यूज )  - वेदांमध्ये सांगितले आहे की विश्व हे परमात्म्याचे रुप आहे. सर्वांच्या ह्रदयामध्ये स्थित परमात्मा आहे, मात्र आपण केवळ मूर्तीमध्ये परमेश्वराला पाहतो. केवळ मूर्तीमध्ये परमेश्वर आहे, हे म्हणणे म्हणजे अर्धवट ज्ञानाचे लक्षण आहे. मात्र, मूर्तीत परमेश्वर नाही, असे नाही. प्रतिमेतील परमेश्वर भावनेने आहे आणि प्राणीमात्रांमध्ये परमेश्वर आत्मरुपाने प्रत्यक्ष आहे. त्यामुळे प्राणीमात्रांची सेवा व पूजा व्हायला हवी, असे धाराशिव येथील संत गोरोबाकाका मंदिराचे ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास यांनी सांगितले.
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महोत्सवात प्रवचन व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद््घाटन पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थाचे माजी विश्वस्त ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, इंद्रजीत रायकर, माऊली रासने, विजय चव्हाण, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, सौरभ रायकर, ह.भ.प. मारुती महाराज कोकाटे, ह.भ.प. संजय बालवडकर, ह.भ.प. पोपटराव बराटे आदी उपस्थित होते. तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ हा कार्यक्रम सुरु आहे.
 
ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे म्हणाले, समाज परिवर्तनासाठी दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे तबल ४१ ते ४२ विषयांवर सातत्याने कार्य सुरु आहे. वारीमध्ये देखील निर्मल वारी, हरित वारी यांसारखे अभियान पंढरपूर, देहू व आळंदी देवस्थानसोबत राबविण्यात येत आहे. सामाजिक कार्यासोबतच चातुर्मासानिमित्त ज्ञानयज्ञ होणे, हे देखील उत्तम कार्य आहे. ट्रस्टच्या सामाजिक, धार्मिक कार्याला आमचाही पाठिंबा असाच राहिल.
 
माणिक चव्हाण म्हणाले, दिनांक ६ ते १२ जुलै रोजी दररोज सायंकाळी ६.३० वाजता प्रवचन होणार आहेत. त्यामध्ये संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे, सुतारवाडीचे ह.भ.प. राजेंद्र महाराज दहिभाते, श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील भाषाप्रभू ह.भ.प.डॉ.पंकज महाराज गावडे, पुण्याचे ह.भ.प. अभय महाराज टिळक, मुंबईचे ह.भ.प.चिन्मय महाराज सातारकर, ह.भ.प.भगवतीताई सातारकर यांचे प्रवचन असणार आहे.
 
तसेच दिनांक १३ ते १९ जुलै दरम्यान दररोज सायंकाळी ५.३० ते ८ यावेळेत चातुर्मास कीर्तनांतर्गत महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत. त्यामध्ये गुरुवारपासून (दि. १३ जुलै) अनुक्रमे मुंबईचे ह.भ.प.चिन्मय महाराज सातारकर, ह.भ.प.भगवतीताई सातारकर, पंढरपूर येथील संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज नामदास, आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शिंदे, राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.चारुदत्तबुवा आफळे, नागपूर येथील ह.भ.प.संजय महाराज पाचपोर, पैठण येथील संत एकनाथ महाराज यांचे वंशज ह.भ.प.योगिराज महाराज गोसावी - पैठणकर हे कीर्तन करणार आहेत. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे.