डीएसके फ्लॅट धारक कर्जदारांचे टाटा कॅपिटलसमोर आंदोलन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

डीएसके फ्लॅट धारक कर्जदारांचे टाटा कॅपिटलसमोर आंदोलन

पुणे, (प्रबोधन न्यूज) – कुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी.एस.के यांच्या पिरंगुट, जिल्हा पुणे येथील गृह योजनेत गृहवित्त संस्थांनी डी.एस.के यांच्याशी हातमिळवणी करत शेकडो खातेदारांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे सर्व कर्जदार अडचणीत आले आहेत. हे कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपन्यांविरोधात डीएसके फ्लॅट धारक व पुणेकर नागरिक कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज (मंगळवार) टाटा कॅपिटल या वित्त संस्थेच्या टिळक रोड येथील कार्यालयावर कर्जदारांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात प्रकल्प बाधीतांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. या वेळी आमची कर्जे माफ करा, सिबिल रिपोर्ट नॉर्मल करा अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात  पुणेकर नागरिक कृती समितीचे पदाधिकारी व फ्लॅट धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घर तर नाहीच पण कर्जाचा डोंगर मात्र शिरावर त्यामुळे सर्वांचेच सिबील रिपोर्ट खराब झाले असून कोणत्याही बँका या ग्राहकांना कर्ज देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे मुलांचे उच्च शिक्षण, शाळांच्या फी, आरोग्य समस्या तसच नवीन कुठेही घर घ्यायचे झाले तर कोणालाही कर्ज मिळत नाही अशी परिस्थिती पिरंगुट यथील योजनेतील गुंतवणुकदारांची झाली आहे. त्यामुळे सर्वांच्याच मनात प्रचंड असंतोष असून गृहकर्ज देणाऱ्या या गृहवित्त संस्थांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय कोणताही मार्ग या कर्जदारांसमोर राहिलेला नाही.

अशीच निदर्शने गुरूवार, दि. ९ जून २०२२ रोजी सकाळी ११ वाजता एच.डी.एफ.सी. हाऊसिंगच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्यालयाशेजारी असणाऱ्या कार्यालयावर तसेच पी.एन.बी. हाऊसिंगच्या जंगली महाराज रस्त्यावरील पाषाणकर ऑटो शेजारील रस्त्यावर द. १ वाजता या प्रकल्पात गुंतवणूक केलेल्या आणि फसलेल्या कर्जधारकांनी गुरूवारच्या आंदोलनात मोठ्या संख्यने सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. या गृहवित्त संस्थांनी केलेल्या फसवणकीविराधात उच्च न्यायालयात जनहित याचिकादेखील करण्यात येणार आहे, असे पुणेकर नागरिक कृती समितीचे सचिव मिहीर थत्ते यांनी सांगितले.