तीन चमचे 'हेलियम-3' ची ताकद 5 हजार टन कोळशा एवढी आहे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

तीन चमचे 'हेलियम-3' ची ताकद 5 हजार टन कोळशा एवढी आहे

चंद्रावर 'हेलियम-3' चा प्रचंड खजिना

भविष्यात चीन चंद्रावर आपला हक्क सांगेल

एका अंदाजानुसार, चंद्रावर मोठ्या प्रमाणात 'हेलियम-3' दडले आहे. त्यामुळे जगभरातील देश यामागे लागले आहेत. तज्ज्ञांच्या मते, 3 चमचे 'हेलियम-3' पृथ्वीवरील सुमारे 5 हजार टन कोळशाच्या समान आहे.

चंद्राच्या भूगर्भात अब्जावधी डॉलर्सचा खजाना दडला आहे. तो काढण्याच्या मुद्यावरुन अमेरिका व चीन या देशांत संघर्ष होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्रालयाचे माजी अधिकारी माल्कम डेव्हिस यांनी म्हटले आहे की, 2030 पर्यंत चंद्रावर किमान एक चिनी कंपनी असेल. ती चीनने संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर दावा सांगितला तसा चंद्रावरील संपूर्ण संसाधनांवर आपला दावा सांगेल.

चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची चीनला स्पेस इंडस्ट्री बनवण्याची महत्कांक्षा आहे. त्यांनी 2025 पर्यंत रोबोटने सूसज्ज असणारी एक चांद्र मोहीम आखली आहे. तसेच 2030 पर्यंत मानवी चांद्र मोहीम राबवण्याचीही त्यांची तयारी आहे. यावरुन चीन भविष्यातील 'नासा' बनण्याच्या प्रयत्नांत असल्याचे स्पष्ट होते.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, अंतराळात उपग्रहांची गर्दी झाली असताना अमेरिका व चीनकडून राबवण्यात येणाऱ्या अंतराळ मोहिमा अत्यंत धोकादायक आहेत. एलन मस्क व जेफ बेजोस सारख्या अब्जाधीशांपासून रवांडा व फिलिपाइन्सपर्यंतचे अनेक देश स्वतःचे उपग्रह प्रक्षेपित करत आहेत. या सर्वांचा हेतू डिजिटल जगाशी ताळमेळ साधणे व व्यावसायिक संधी शोधण्याचा आहे. अमेरिका व चीनने या बाबतीत मोठा डाव मांडला आहे. अंतराळ क्षेत्रात हे दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे अंतराळात मोठी शस्त्रास्त्र स्पर्धा माजण्याची भीती निर्माण झाली आहे.