'हे' आहेत भारतातील सात सर्वाधिक मानधन घेणारे न्यूज अँकर; 'यांचा' वार्षिक पगार आहे तब्ब्ल १२ कोटी !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली - पत्रकारितेकडे पूर्वी चांगला कमाईचा व्यवसाय म्हणून पाहिले जात नव्हते. पण आता असे नाही आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, प्रसिद्ध समालोचकही पत्रकारितेच्या क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहेत. चला तर, जाणून घेऊया भारतातील टॉप सात सर्वाधिक मानधन घेणारे न्यूज अँकर कोण आहेत ते.
१. अर्णब गोस्वामी
अर्णब रंजन गोस्वामी हे रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संपादक आहेत. अर्णब गोस्वामी हे भारतातील हायेस्ट पेड न्यूज अँकर आहेत आणि त्यांचा वार्षिक पगार सुमारे १२ कोटी आहे. ४७ वर्षीय अर्णब गोस्वामी मूळचे गुवाहाटीचे आहेत. ते एक स्पष्टवक्ते पत्रकार म्हणून ओळखले जातात आणि बातम्या सांगण्याची करण्याची त्यांची शैली खूप आगळी आहे. “द नेशन वॉन्ट्स टू नो” आणि “पुछता है भारत” सारख्या शोमध्ये त्यांची चमकदार पत्रकारिता पाहिली आहे.
२. राजदीप सरदेसाई
भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या पत्रकारांच्या यादीत राजदीप सरदेसाई दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा वार्षिक पगार १० कोटी रुपये आहे. त्यांची अप्रतिम संवादशैली आणि तर्क मांडण्याची कला त्यांना एक वेगळी ओळख देते. कधीकधी, ते ग्राउंड लेव्हल रिपोर्टिंग देखील कव्हर करतात. ते सध्या इंडिया टुडे ग्रुपचे सल्लागार संपादक आहेत, तसेच इंडिया टुडे टेलिव्हिजनचे अँकर आहेत.
३. निधी राजदान
निधी राजदान भारतातील टॉप हायेस्ट पेड न्यूज अँकरच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या त्या एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक आणि लोकप्रिय न्यूज अँकर आहेत. त्या 'एनडीटीव्ही 24×7 न्यूज शो' आणि 'लेफ्ट, राइट अँड सेंटर' या कार्यक्रमाच्या मुख्य अँकर आहेत. त्यांनी दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमधून पत्रकारितेची पदवी घेतली आहे. त्यांचा वार्षिक पगार सुमारे ४ कोटी रुपये आहे.
४. रजत शर्मा
हायेस्ट पेड न्यूज अँकरमध्ये पुढचे नाव आहे रजत शर्मा यांचे. जे इंडिया टीव्हीचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक आहेत. त्यांचा टीव्ही शो ‘आप की अदालत’ खूप लोकप्रिय आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा वार्षिक पगार ३.६ कोटी रुपये आहे.
५. श्वेता सिंग
भारतातील हायेस्ट पेड न्यूज अँकरच्या यादीत श्वेता सिंगचाही समावेश आहे. त्या एक सुप्रसिद्ध न्यूज अँकर तसेच 'आजतक'मधील विशेष कार्यक्रमांच्या कार्यकारी संपादक आहे. खेळाशी संबंधित बातम्या कव्हर करण्याच्या कौशल्यासाठी त्या प्रसिद्ध आहे. याशिवाय त्या ग्राउंड रिपोर्टिंगही करतात. त्यांना वर्षाला सुमारे ३.४ कोटी रुपये मानधन मिळते.
६. सुधीर चौधरी
सुधीर चौधरी सध्या 'झी न्यूज' या हिंदी वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक आहेत. ते 'डेली न्यूज अँडऍनालिसिस' या वृत्त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. त्यांना २०१३ साली "हिंदी प्रसारण" या श्रेणीतील उत्कृष्ट पत्रकारितेसाठी रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा वार्षिक पगार सुमारे ३ कोटी रुपये आहे.
७. रवीश कुमार
'एनडीटीव्ही इंडिया'चे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार हे हायेस्ट पेड न्यूज अँकर आहेत. बातम्या मांडण्याची त्यांची खास पद्धत आहे.ते अनेक लोकप्रिय कार्यक्रम होस्ट करतात. त्यापैकी प्रमुख कार्यक्रम म्हणजे 'प्राइम टाइम', 'रवीश की रिपोर्ट' आणि 'देश की बात'. त्यांचा वार्षिक पगार सुमारे २.४ कोटी आहे.