मोदींना टक्कर देण्यासाठी आणखी एक पक्ष जन्माला येणार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
बिहार, दि. २ मे - पीके या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर या राजकीय रणनीतीकाराने ते स्वतःचा कोणताही पक्ष काढणार आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट केलेले नाही, मात्र त्यांच्या हालचालीवरून तसे सर्वांना वाटत आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करून सर्वात जुन्या पक्षाच्या पुनरुज्जीवनाचे मिशन मध्येच सोडून ते नवी राजकीय सुरुवात करतील, असे मानले जात आहे.
देशातील प्रख्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (पीके) यांनी सोमवारी त्यांच्या नवीन 'जन सूरज' मोहिमेचे उद्घाटन केले. त्याची सुरुवात बिहारपासून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे आणि सर्वात जुन्या पक्षाच्या पुनरुज्जीवनाचे मिशन मध्येच सोडून ते नवी राजकीय सुरुवात करतील, असे मानले जात आहे.
प्रशांत किशोर यांनी ट्विट करून आपल्या नव्या मोहिमेची घोषणा केली आहे. "लोकशाहीत अर्थपूर्ण सहभागी होण्यासाठी आणि लोकाभिमुख धोरणे तयार करण्यात मदत करण्याच्या माझ्या प्रयत्नात गेल्या 10 वर्षांत चढ-उतार आले आहेत," असं त्यांनी म्हटलं आहे. आता मी एक नवीन पान चालू करणार आहे. आता वेळ आली आहे 'रिअल मास्टर्स'कडे जाण्याची म्हणजेच लोकांचे प्रश्न आणि सार्वजनिक सुराज्याचा मार्ग चांगल्या प्रकारे समजून घेण्याची, त्याची सुरुवात बिहारपासून होईल.'
गेल्या काही दिवसांपासून प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. नुकतेच, त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या चांगल्या कामगिरीबाबत पक्षाच्या कायाकल्पाचे सादरीकरण देखील सादर केले, तरीही काँग्रेस आणि त्यांच्यातील बोलणी निष्फळ ठरली आणि शेवटच्या फेरीत त्यांनी काँग्रेस सोडली.
काँग्रेससोबतची चर्चा बिघडल्याने प्रशांत किशोर सातत्याने चर्चेत आहेत. सोमवारी सकाळी वरील ट्विट करून, त्यांनी लोकशाहीत अर्थपूर्ण भूमिका बजावण्यासाठी आणि लोकस्नेही धोरणांना आकार देण्यासाठी त्यांचे नवीन प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
पीके स्वत:चा पक्ष काढतील, ज्याचे नाव 'जन सूरज' असेल, असे मानले जात आहे. त्याच्या सूचनांवरून असे दिसते. बिहारमधून सुरुवात करण्यासाठी पीके पाटण्याला पोहोचला आहे. ते येथून मोठ्या घोषणाही करू शकतात. पटना येथील पॉश भागात त्यांचे कार्यालय तयार असल्याचे बोलले जात आहे.