२० जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होणार ? १० ते १२ जण शपथ घेणार ?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

२० जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होणार ? १० ते १२ जण शपथ घेणार ?

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने २९ जूनला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. ३० जूनला झालेल्या या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार माहितीनुसार आता २० जुलैला म्हणजेच राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात १० ते १२ मंत्र्याना शपथ दिली जाईल. त्यानंतर २५ जुलैपासून अधिवेशन सुरू होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होणार होतं. मात्र १८ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्यामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे अधिवेशन २५ जुलैपासून सुरू होईल असं समजतंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनाही मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी त्या दोघांनीही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं सांगितलं आहे. शुक्रवारच्या ‘सामना’तून मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने टीका करण्यात आली होती. तसंच राज्यपाल लाटा मोजत बसले आहेत का? ते आता या नव्या सरकारला प्रश्न का विचारत नाहीत? त्यांना मार्गदर्शन का करत नाहीत हे विचारण्यात आलं होतं. तसंच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याच्या मुद्द्यावरून टीका केली होती. दोघेच महाराष्ट्राचे मालक आहेत का असा सवाल त्यांनी केला होता.

या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार २० जुलैला केला जाईल असं सांगण्यात येत आहे.