तब्बल ११९ वर्षे जगलेल्या जपानच्या केन तनाका यांचे निधन 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

तब्बल ११९ वर्षे जगलेल्या जपानच्या केन तनाका यांचे निधन 

नवी दिल्ली - जगातील सर्वात वृद्ध महिला केन तनाका यांचं नुकतंच म्हणजे 19 एप्रिल रोजी निधन झालं. जपानच्या रहिवासी असलेल्या केन यांनी वयाच्या 119 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म 2 जानेवारी 1903 रोजी दक्षिण-पश्चिम जपानमधील फुकुओका येथे झाला. ज्या वर्षी केन तनाकाचा जन्म झाला, त्याच वर्षी राइट बंधूंनी पहिले विमान उड्डाण घेतले.

2019 मध्ये त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आले होते, ज्यामध्ये केन तनाका या जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती असल्याचे सांगण्यात आले होते. केन तनाका यांचे निधन झाल्याचे जपान सरकारने सोमवारी जाहीर केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केन तनाका यांनी 19 एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये जगाचा निरोप घेतला. केन तनाका यांच्या निधनानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही ट्विट केले आणि सांगितले की, केन या जगात नाही हे सांगताना आम्हाला दु:ख होत आहे.

केन तनाका यांना चॉकलेट आणि फिजी ड्रिंक्सची आवड होती. केन यांचे 1922 साली लग्न झाले होते आणि त्या 4 मुलांची आई होत्या. अलीकडच्या काळात त्या एका नर्सिंग होममध्ये राहत होत्या. इथे त्या सोडा, चॉकलेट, बोर्ड गेम्सचा आनंद घ्यायच्या. 

2019 मध्ये जेव्हा त्यांचे नाव गिनीज वर्ल्डमध्ये दाखल झाले, तेव्हा त्या 116 वर्षांच्या होत्या. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना 'जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती' म्हणून स्थान दिले आहे.

सप्टेंबर 2020 मध्ये, वयाच्या 117 वर्षे आणि 261 दिवसात, तनाका जपानमधील आतापर्यंतची सर्वात वृद्ध व्यक्तीबनल्या होत्या. तनाकाच्या मृत्यूनंतर आता फ्रान्सच्या ल्युसिल रेंडन जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनली आहे, ज्यांचे वय 118 वर्षे 73 दिवस आहे.

गणितातील कठीण प्रश्न सहज सोडवायच्या केन 
केन तनाका यांना चॉकलेट आणि सोडा खाणे खूप आवडायचे. याशिवाय त्या नर्सिंग होममध्ये बोर्ड गेम खेळायच्या आणि गणितातील अवघड प्रश्न सोडवायच्या. जेव्हा त्या तरुण होत्या तेव्हा नूडल्स तसेच राईस केकचा व्यवसाय करत. 

तनाकाला नऊ भावंडे होती. 1922 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी हिदेओ तनाकाशी लग्न केले. या जोडप्यास चार मुले होती आणि त्यांनी पाचवे मूल दत्तक घेतले.

जाणून घ्या काय होते दीर्घायुष्याचे रहस्य ?
स्वादिष्ट अन्न खाणे आणि नवीन गोष्टी शिकणे हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे केन तनाका यांनी सांगितले. त्यांच्या रोजच्या आजारात चॉकलेट आणि सोड्याचाही समावेश होता.