पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे अजित पवारांनी दिले संकेत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे अजित पवारांनी दिले संकेत

मुंबई, दि. २८ एप्रिल -  इंधनाच्या व्हॅटबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोलवरचा व्हॅट कमी करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. इंधनावरील व्हॅटबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊ शकते, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक पार पडते आहे. या बैठकीत इंधनाच्या व्हॅटबाबत सखोल चर्चा करुन निर्णय घेऊ, असं अजित पवारांनी म्हटलंय. दरम्यान, ठाकरे सरकारने इंधनावरील व्हॅट जर कमी करण्याचा निर्णय घेतला तर महागाईने होरपळलेल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशातील विविध मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कर कपात करून जनतेला दिलासा देण्याचं आवाहन केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पंतप्रधान मोदींच्या या आवाहनानंतर आता महाराष्ट्राचा वित्त विभाग यावर निर्णय घेण्याच्या विचारात आहे. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता, पेट्रोलवरचा व्हॅट कमी करण्याचे संकेत त्यांनी दिले.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्यासंबंधी काय मार्ग काढता येऊ शकतो याच्यावर चर्चा करुन निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले. गॅस दराबाबत दिलासा देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने याअगोदरच घेतला आहे. पेट्रोल परदेशातून आयात केल्यानंतर जो टॅक्स आहे त्यामध्ये केंद्र सरकारच्या टॅक्सपेक्षा थोडासा जास्त टॅक्स महाराष्ट्र सरकारचा आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी चर्चा होऊ शकते, असं म्हणत व्हॅट कमी करण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले.