ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे सरकार कोसळले, दिला राजीनामा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
लंडन, (प्रबोधन न्यूज) – महाराष्ट्रातील बंडखोरीची लागण ब्रिटनमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाला परदेशातही प्रसिद्धी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. बहुधा त्याचीच प्रेरणा घेऊन लंडनमध्येही बंड झाले की काय अशी शंका येतेय. बंड ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कंजर्वेटिव पक्षात झाले असून आतापर्यंत ४ केंद्रीय मंत्र्यासह ४० जणांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यामुळे बोरिस जॉन्सन यांचे सरकार कोसळले असून त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यवा लागला आहे.
बोरिस जॉन्सन सरकारमध्ये अनेक दिवसांपासून अंतर्गत वाद सुरू होता. अनेक नेते बोरिस यांच्यावर नाराज होते. यामुळे पक्षात बंडाचे वारे वाहत असल्याची बोरिस यांनाही कल्पना होती. मात्र अचानक अर्थमंत्री ऋषि सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी ५ जुलैला आपल्या पदाचा राजीनामा दिला. बोरिस जॉन्सन यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊनच आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे या दोघांनी सांगितले होते. तसेच जाता जाता बोरिस त्यांच्या नेतृत्वावरच या दोघांनी प्रश्नचिन्ह उभे केले.
ऋषि यांनी आपल्या राजीनामा पत्रात काही मुद्दे मांडले होते. त्यात त्यांनी सरकारकडून जनतेच्या अपेक्षा आहे. पण त्या पूर्ण करण्यास सरकार सक्षम नसल्याची खंत त्यांनी राजीनामा पत्रात व्यक्त केली होती. तसेच आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनीही सरकार लोकहितासाठी काम करत नसल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे बोरिस जॉन्सन यांची माफी मागितल्यानंतरच या दोघांनी राजीनामे दिले . त्यानंतर केंद्रीय मंत्री सायमन हार्ट यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री असलेल्या ब्रँडन लुईस यांनीही राजीनामा दिला. या गळतीमुळे बोरिस याच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत होती. तर जनतेने आपल्याला निवडून दिले आहे असे ज़ॉन्सन सातत्याने सांगत होते. पण अखेर वाढत्या दबावामुळे आज बोरिस जॉन्सन यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला.
या संपूर्ण बंडाळीमागे सध्या एकाच व्यकतीच्या नावाची चर्चा आहे. ती व्यक्ती आहे क्रिस पिंचर. क्रिस पिंचरवर सेक्स स्कॅडलचा आरोप आहे. पण तरीही यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जॉन्सन यांनी क्रिस पिंचरची उप प्रतोद म्हणून नियुक्ती केली. ज्यास पक्षातील सगळ्यांचाच विरोध होता. ३० जून रोजी ब्रिटनच्या ‘द सन’ या वृतपत्रात एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यात क्रिस पिंचरने लंडनच्या एका कल्बमध्ये दोन पुरुषांबरोबर अश्लिल कृत्य केल्याचे आरोप करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर पिंचर यांना आपल्या उप प्रतोदपदाचा राजीनामा द्यावा लागला. पिंचर यांच्यावर याआधीही अनेकवेळा लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप करण्यात आले आहे.
पण त्यानंतर बोरिस यांच्या पक्षातीलच नेत्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. पिंचरवरील सगळ्या आरोपांची माहिती बोरिस यांना होती. पण त्यांनी त्याच्याविरोधात कधीही कसलीही कारवाई केली नाही. कोरोना काळात १९ जून २०२० रोजी बोरिस यांचा वाढदिवस होता. यामुळे कोरोना प्रॉटोकॉलप्रमाणे जॉन्सन यांना दोनच व्यक्तींना घरी बोलावयाचे होते. पण बोरिस यांनी नियम धाब्यावर बसवत घरात जंगी पार्टी दिली. यापार्टीत ३० जण सामील होते. बोरिस हे त्यांच्या रंगेल आणि हजरजबाबी स्वभावासाठी ओळखले जातात.
दरम्यान, बोरिस यांच्या पक्षात राजीनामा सत्र सुरू झाले. एकापाठोपाठ एक नेते त्यांना सोडून जाऊ लागले. त्यांच्याच पक्षातील लोक त्यांच्याविरोधात आग ओकत होते. बोरिस हे जगातील एकमेव असे पंतप्रधान आहेत ज्यांच्यावर उच्च पदावर असूनही नियम तोडल्याचा आरोप आहे. दरम्यान ४० मंत्री सोडून गेल्याने बोरिस यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव वाढला होता. विरोधकांबरोबरच त्यांच्याच पक्षातील कार्यकरते त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. त्यामुळे बोरिस ज़ॉन्सन यांना आज राजीनामा द्यावा लागला.